Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोळसा मंत्र्यांच्या नावाने 1 कोटीची खंडणी, आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर पोलिसांनी केला पर्दाफाश, वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी फसवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 31, 2023 | 01:12 PM
कोळसा मंत्र्यांच्या नावाने 1 कोटीची खंडणी, आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर पोलिसांनी केला पर्दाफाश, वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर- केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावाचा वापर करून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचा सूत्रधार मयंक कुमार उर्फ वंश अग्रवाल आणि कथित पत्रकार पियुष पुरोहित यांना पोलिसांनी अटक केली आहे. मयंकचे सहकारी संजय बघेल आणि संजीत बघेल यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे. पियुष हा मध्य प्रदेशात साप्ताहिक आणि वेब पोर्टलचा प्रतिनिधी आहे. आरोपी मध्य प्रदेशातील एका कोळसा उद्योजकाला 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. या विरोधात व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी फसवले
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी फसवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली आहे. पीयूष पुरोहित, राष्ट्रभान पोर्टलचा पत्रकार संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बनावट कागदपत्र वापरल्याचा आरोप करीत एक कोटीची खंडणी मागितली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील कोळसा व्यापारी गुप्ता यांना गेल्या काही दिवसांपासून तोतया पत्रकार पीयूष पुरोहित, वंश अग्रवाल, मध्यप्रदेशातील शिवनी येथील राष्ट्रभान डॉट इन या पोर्टलचा संजय बघेल, संजीत बघेल हे चौघेही एक कोटी रुपयांची खंडणी मागत होते. पीयूष आणि बघेल हे दोघेही गुप्ता यांच्याविषयी बदनामीकारक बातम्या प्रकाशित करीत होते. त्यामुळे गुप्ता यांनी दिवानी न्यायालयात बघेल बंधूंना खेचले होते. न्यायालयाने दोघांनाही कोणतेही वृत्त प्रकाशित न करण्याच्या अटीवर सोडले होते. या घटनाक्रमानंतर चौघांनी गुप्ता यांना खंडणी मागण्याचा नवा कट रचला. वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार याने गुप्ता यांना केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे विशेष कार्यासन अधिकारी (ओएसडी) यांच्या नावाने फोन केला. कोळसा व्यापारात काही बनावट कागदपत्र वापरल्याचा आरोप करीत एक कोटीची खंडणी मागितली. आरोपींनी गुप्ता यांच्या पुतण्याची भेट घेऊन 10 लाखांची मागणी केली.

Web Title: Extortion of 1 crore in the name of coal minister nagpur police busted the inter state racket read what exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2023 | 01:12 PM

Topics:  

  • Coal india
  • Marathi News
  • Nagpur Police

संबंधित बातम्या

Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय
1

Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर
2

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर

Raigad News: रायगडमधील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांची भुरळ
3

Raigad News: रायगडमधील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांची भुरळ

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप
4

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.