Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Dudh News: फडणवीसांची एंट्री अन् गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट; पडद्यामागे मोठ्या हालचाली

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून अंबरिशसिंह घाटगे यांचे नाव सध्या पुढे येत आहे. अंबरिशसिंह घाटगे सध्या भाजपसोबत असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 30, 2025 | 01:20 PM
Gokul Dudh News: फडणवीसांची एंट्री अन् गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट; पडद्यामागे मोठ्या हालचाली
Follow Us
Close
Follow Us:

Gokul Dudh News: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाची आज निवड होणार आहे. पण गोकुळच्या राजकारणात मात्र वेगळ्याच हालचालींना सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (२९ मे) महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अडीच तास खलबतं झाली. या बैठकीबाबत कोणतीही माहिती पुढे आली नसली तरी, आज संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये धक्कादायक नाव समोर येऊ शकते. महायुतीचाच अध्यक्ष करण्यासाठी अजित नरकेस नाविद मुश्रीफ, अमरीशसिंह घाटगे, अमर पाटील या नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी यापूर्वी अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांची नावे समोर आली होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचाच अध्यक्ष करण्याच्या सुचना दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, महायुतीचाच अध्यक्ष होण्यासाठी गोकुळचे अध्यक्ष अरूण डेंगळे यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली होती. पण तीन दिवसांतच त्यांचे बंड शांत झाले. त्यानंतर गोकुळचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात होते. आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये त्यांच्या नावाची घोषणाही केली जाणार होती.पण काल अचानक महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी थेट फडणवीस यांनीच हस्तक्षेप केल्यामुळे गोकुळच्या राजकीय वर्तुळात पडद्यामागे घडामोडींना वेग आला आहे.

शशिकांत पाटील-चुयेक हे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहेत. ते जर अध्यक्ष झाले तर गोकुळवर काँग्रेसचा आणि पर्यायाने सतेज पाटील यांचा समर्थक अध्यक्षपदी विराजमान होईल. त्यामुळे महायुतीचाच अध्यक्ष करा, मग तो कुणीही असला तरी चालेल, अशा सुचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे बोलले जात आहे. जिल्हा बँकेत यासंदर्भात झालेल्या बैठकीतही नेत्यांच्या देहबोलीतून काही तरी नवे समीकरण तयार होत असल्याचे संकेत मिळाले. त्यामुळेच याआधी अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले चुयेकर यांचे नाव मागे पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अंबरिशसिंह घाटगे प्रबळ दावेदार?

दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून अंबरिशसिंह घाटगे यांचे नाव सध्या पुढे येत आहे. अंबरिशसिंह घाटगे सध्या भाजपसोबत असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. विशेष म्हणजे तेते विरोधी पॅनेलमधून विजयी झाल्यामुळे त्यांच्या नावाला गोकुळच्या अंतर्गत समीकरणांमध्ये त्यांना किती पाठिंबा मिळतो, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

याशिवाय, महायुतीचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी अमर यशवंत पाटील यांच्या नावाचाही जोरदार पाठपुरावा केला आहे. मात्र, या नावावर सर्व नेत्यांचे एकमत होणे कठीण असल्याचे दिसते. घाटगे अध्यक्ष झाले, तर त्यांना नाविद मुश्रीफ यांचाही विरोध होणार नसल्याची शक्यता आहे, कारण स्थानिक राजकारणात घाटगे आणि मुश्रीफ यांचे संबंध सौहार्दाचे आहेत. यामुळेच घाटगे हे सर्वसाधारण सहमतीचे नाव ठरू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सेनेचा अध्यक्ष करण्याच्या हालचाली

काल झालेल्या बैठकीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अजित नरके, नाविद मुश्रीफ आणि अंबरिशसिंह घाटगे या तिघांच्या नावांवर चर्चा झाली. यापैकी एका नावावर आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचाच अध्यक्ष करावा, अशी जोरदार मागणी काही नेत्यांकडून पुढे आली आहे. त्यामुळेच शिवसेनेचे अजित नरके हेही अध्यक्षपदासाठी आघाडीच्या स्पर्धेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

Web Title: Fadnavis entry and a big twist in gokuls election to the post of president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti

संबंधित बातम्या

लाडक्या बहिणींसोबत ‘देवाभाऊ’ची सेल्फी! “एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’…”; काय म्हणाले CM देवेंद्र फडणवीस?
1

लाडक्या बहिणींसोबत ‘देवाभाऊ’ची सेल्फी! “एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’…”; काय म्हणाले CM देवेंद्र फडणवीस?

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला
2

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Mahayuti: “भाजपकडून जागा न मिळाल्यास…”; आगामी निवडणुकीवरून आठवलेंचा महायुतीला इशारा
3

Mahayuti: “भाजपकडून जागा न मिळाल्यास…”; आगामी निवडणुकीवरून आठवलेंचा महायुतीला इशारा

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन
4

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.