Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fadnavis on Bapat: डीजेविरोधी भूमिका घेतल्याने चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात भरदिवसा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 03, 2026 | 05:18 PM
Fadnavis on Bapat: डीजेविरोधी भूमिका घेतल्याने चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Fadnavis on Bapat: डीजेविरोधी भूमिका घेतल्याने चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:
  • डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या बापट यांना गुरुवारी मारहाण
  • हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणला पोलिसांनी घेतले ताब्यात
  • मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला; फडणवीसांची प्रतिक्रिया
Fadnavis on Bapat: गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी पुण्यात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. टिळक रस्त्यावर माध्यमांशी संवाद साधत असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात संतोष चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत मत मांडताना हल्ला करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले.

मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला

मुंबईत माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, त्या पद्धतीने मत मांडत असताना एखाद्यावर हल्ला करणे योग्य नाही. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारचे वाद होणे योग्य नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव अधिक पारंपरिक पद्धतीकडे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. पहिल्याच वर्षी हे शंभर टक्के शक्य होणार नाही; मात्र त्यादिशेने सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Pune Crime News: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर

डीजेच्या आवाजाविरोधात बापटांची भूमिका

विद्यानंद बापट हे नारायण पेठ परिसरातील रहिवासी असून, पर्यावरण आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडत आहेत. पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांमुळे होणाऱ्या मोठ्या आवाजाला त्यांनी यापूर्वी विरोध केला होता. बापट यांनी पुणे महानगरपालिकेच्या सभेतही डीजेच्या वापराला विरोध केला होता. त्यावेळी काही गणेश मंडळांचे प्रतिनिधी तसेच राजकीय व्यक्तींनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्या वेळी पालिकेच्या सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात त्यांना सभागृहाबाहेर नेण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते.

माध्यमांशी बोलताना हल्ला

गुरुवारी टिळक रस्त्यावर बापट हे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले असून, हल्ल्याचे नेमके कारण आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला

‘सवंग प्रसिद्धीसाठी हल्ला’ असा बापटांचा आरोप

हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया देताना आपण असुरक्षित स्थितीत असताना हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला. हा प्रकार सवंग प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. घटनेचे व्हिडीओ फुटेज उपलब्ध असल्याचा दावा करत पोलिसांनी ते तपासून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास आपला विरोध नसून, उत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषण होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, एवढीच आपली भूमिका असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेमुळे डीजे, ध्वनीप्रदूषण आणि गणेशोत्सवाच्या पारंपरिक स्वरूपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: Fadnavis on bapat vidyanand bapat who made headlines for his stance against djs attacked fadnavis gives first reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 05:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.