Fake currency In Maharashtra: देशात नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नोटबंदीची घोषणा केली. या निर्णयानुसार, त्या रात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या. नोटबंदीमागचा प्रमुख उद्देश काळा पैसा बाहेर काढणे, बनावट नोटांवर लगाम घालणे आणि देशातील भ्रष्टाचार कमी करणे हा होता. पण नोटाबंदीच्या निर्णय़ानंतरही देशात काळ्या पैशांचे व्यवहार, बनावट नोटा छापण्याची कामे सुरूच असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आणि भिंवडीत बनावट नोटा छापण्याचे केंद्रबिंदू ठरत असल्याचा खुलासा केला आहे.
आज (१६ जुलै) विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिले आहे.”नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा विळखा कायम असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. पुणे आणि भिवंडी हे बनावट नोटा छापण्याची केंद्र ठरत आहेत. राज्यात विशेषतः पुणे आणि भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांची छपाई होत आहे. त्यामुळे राज्याला बनावट नोटांचे नेटवर्क रोखण्याचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठमोळ्या Riteish Deshmukh ने गमावली मोठ्या भावाइतकी जवळची व्यक्ती, शेअर केली भावनिक पोस्ट
राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांची निर्मिती होत असून पुणे आणि भिवंडी हे बनावट नोटा छापण्याचे हॉटस्पॉट झाले आहे. साल 2020 पासून आजपर्यंत राज्यात बनावट नोटांशी संबंधित एकूण 273 गुन्हे दाखल झाले असून, याप्रकरणी 566 जणांना अटक करण्यात आली आहे. हे गुन्हे प्रामुख्याने पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि भिवंडी परिसरात नोंदवले गेले आहेत.
कारवाईदरम्यान पोलिसांनी एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून, या प्रकरणावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचे जाळे कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारपुढे आता हे बनावट चलन रोखण्याचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.
Pune Crime News पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मोठं रॅकेट उद्ध्वस्त
पुण्यात बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २८ लाख ६६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा, २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा तसेच नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे अत्याधुनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी मनिषा स्वप्निल ठाणेकर (रा. येरवडा), भारती तानाजी गवंड (रा. चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (रा. गहुंजे), नरेश भिमप्पा शेटटी (रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी (रा. पुणे) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.