Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli News : चामोर्शी तालुक्यातील एमआयडीसीला शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा विरोध; जमीन अधिग्रहणाविरोधात ठिय्या

मुधोली चक क्रमांक १ येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती दिलेली नसतानाही संबंधित जमिनींच्या प्रक्रियेत पुढील कार्यवाही केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 30, 2026 | 11:15 AM
Gadchiroli News : चामोर्शी तालुक्यातील एमआयडीसीला शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा विरोध; जमीन अधिग्रहणाविरोधात ठिय्या

Gadchiroli News : चामोर्शी तालुक्यातील एमआयडीसीला शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा विरोध; जमीन अधिग्रहणाविरोधात ठिय्या

Follow Us
Follow Us:
  • चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला शेतकरी आणि ग्रामस्थांचा विरोध.
  • टप्पा क्रमांक २ आणि ५ मधील तब्बल २ हजार ९६ हेक्टर जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी.
  • गुरुवारपासून मंडळ अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू.
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक विकास महामंडळाच्या जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. टप्पा क्रमांक २ आणि ५ मधील तब्बल २ हजार ९६ हेक्टर जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारपासून येनापूर येथील मंडळ अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या जमिनी, उपजीविका आणि भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. या आंदोलनामुळे चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी भूसंपादनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

येनापूर व जयरामपूर परिसरासह १३ गावांतील शेतकरी, जमीनधारक आणि ग्रामस्थ या प्रश्नावर एकवटले असून, आपल्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू केला आहे. प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक २ मध्ये ४९२ हेक्टर, तर टप्पा क्रमांक ५ मध्ये १ हजार ६०४ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. अशा एकूण २ हजार ९६ हेक्टर क्षेत्रावरील भूसंपादनाचा प्रस्ताव रद्द करून संबंधित क्षेत्र प्रकल्पातून वगळण्यात यावे, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

शेती हा ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी गेल्यास कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे औद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या भवितव्यावर संकट निर्माण होऊ नये, अशी भूमिका बाधित शेतकरी मांडत आहेत. विकासाला विरोध नसून शेतकऱ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून होणाऱ्या भूसंपादनाला विरोध आहे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या हरकतींचा गांभीर्याने विचार करून प्रस्तावित भूसंपादनाचा फेरविचार करावा.

13 गावांचा लढा; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

टप्पा क्रमांक २ आणि ५ मधील २ हजार ९६ हेक्टर उ ६ हेक्टर जमिनीचा भूसंपादन प्रस्ताव रद्द करणे, संबंधित अधिसूचनेबाबत फेरविचार करणे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लेखी निर्णय देणे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून तो त्यांच्या उदरनिर्वाहाचा, कुटुंबाच्या त्यामुळे १३ सुरक्षिततेचा आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे १३ गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या या आंदोलनाची प्रशासन कितपत दखल घेते, तसेच शासन भूसंपादनाबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

शेतकऱ्यांची संमती नसल्याचा आरोप

मुधोली चक क्रमांक १ येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती दिलेली नसतानाही संबंधित जमिनींच्या प्रक्रियेत पुढील कार्यवाही केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. संमतीपूर्वक करारनामा झाल्याचे गृहीत धरून नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रक्रियेवर आक्षेप घेत संबंधित राजपत्रीय अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत भूसंपादन प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करावे आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

FAQ

प्रश्न : चामोर्शी तालुक्यातील एमआयडीसीला विरोध का होत आहे?
उत्तर : प्रस्तावित एमआयडीसीसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण केले जाणार असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांचा विरोध आहे.

प्रश्न : किती जमीन अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव आहे?
उत्तर : एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक २ आणि ५ मधील २ हजार ९६ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव आहे.

प्रश्न : शेतकऱ्यांची प्रमुख मागणी काय आहे?
उत्तर : २ हजार ९६ हेक्टर जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव रद्द करावा, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

Web Title: Farmers and villagers oppose the midc in chamorshi taluka nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Gadchiroli News
  • Land Acquisition

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.