Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांना यंदा एफआरपीपेक्षा मिळणार अधिकची रक्कम

साखर उद्योगावर प्रामुख्याने शुगरकेन (कंट्रोल) ऑर्डर, शुगर (कंट्रोल) ऑर्डर १९६६ आणि शुगर प्राईस कंट्रोल ऑर्डर २०१८ या तीन कायद्यांन्वये नियंत्रण आहे. पहिल्या कायद्यात उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपी, दोन साखर कारखान्यांमधील अंतर आदींचा समावेश असून केंद्राने नव्या बदलामध्ये पहिल्या ऑर्डरला कोणताही हात लावलेला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2024 | 03:03 PM
मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; पावसाअभावी पिके आली संकटात

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; पावसाअभावी पिके आली संकटात

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर / दीपक घाटगे : देशात सध्याच्या कायद्यान्वये साखरेसह प्रेसमड, मळी आणि बगॅस यातील उत्पन्नाचा हिस्सा शेतकर्‍यांना मिळत आहे. मात्र, आता सहवीज निर्मिती, इथेनॉलसह अन्य उपपदार्थांसह सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्नही कारखान्यांच्या उत्पन्नात समाविष्ट होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम यंदाच्या गळीत हंगामात मिळणार आहे.

हेदेखील वाचा : कार आणि बाईक ठीक होतं, पण आता ट्रॅफिक चलनात ही सूट! दिल्ली पोलिसांची अजब ऑफर

याबाबतची माहिती अशी की, केंद्र सरकार कार्यरत असलेल्या शुगर (कंट्रोल) ऑर्डर १९६६ मध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २२ ऑगस्ट रोजी घेतला आहे. त्यावर शुगर (कंट्रोल) ऑर्डर २०२४ चा मसुदा तयार करून देशातील ५३५ साखर कारखाने व साखर महासंघांना पाठवून त्यांच्याकडून २३ सप्टेंबरपर्यंत सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक उपउत्पादनांमधील सरसकट रक्कम उत्पन्नात धरली जाण्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या जादा दराच्या आशा उंचावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

साखर उद्योगावर प्रामुख्याने शुगरकेन (कंट्रोल) ऑर्डर, शुगर (कंट्रोल) ऑर्डर १९६६ आणि शुगर प्राईस कंट्रोल ऑर्डर २०१८ या तीन कायद्यांन्वये नियंत्रण आहे. पहिल्या कायद्यात उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपी, दोन साखर कारखान्यांमधील अंतर आदींचा समावेश असून केंद्राने नव्या बदलामध्ये पहिल्या ऑर्डरला कोणताही हात लावलेला नाही. मात्र, शुगर (कंट्रोल) ऑर्डर १९६६ आणि शुगर प्राईस कंट्रोल ऑर्डर २०१८ यांचे एकत्रीकरण करून शुगर (कंट्रोल) ऑर्डर २०२४ अस्तित्वात आणण्याचे पाऊल उचलले आहे. त्याचे प्रारूप तयार केले असून त्यावर संबंधितांकडून सूचना व हरकती मागविल्या असल्याची माहिती मागवली आहे.

केंद्राच्या कायदा बदलाच्या मसुद्यावर विचारविनिमय करण्यासाठी पुण्यात या विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुल येथे बोलविण्यात आली आहे. या बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघासह देशातील सर्व राज्यस्तरीय साखर संघ व सर्व साखर संस्था, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आदींचे कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये होणार्‍या निर्णयानुसार कायदा बदलांवरील साखर उद्योगाचा एकत्रित मसुदा तयार करून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून केंद्राला देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा: आजच समजून घ्या कारमधील एसी चालवण्याची योग्य पद्धत, मायलेजमध्ये होईल वाढ

Web Title: Farmers will get more amount than frp this year nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप
1

Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप

Kolhapur :  “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील
2

Kolhapur : “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला
3

Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला

Kolhapur News : जागरूक मतदार लोकशाहीचे शिल्पकार; समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘मतदार जागृती मोहीम’ आयोजित
4

Kolhapur News : जागरूक मतदार लोकशाहीचे शिल्पकार; समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘मतदार जागृती मोहीम’ आयोजित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.