Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरातील तापमानात पुन्हा मोठी घट; ग्रामीण भागात गारठ्याची तीव्रता अधिक

कोल्हापूर शहरातील किमान तापमान दोन दिवसांपूर्वी १८.३ अंश सेल्सिअसवर गेले होते. मात्र, बुधवारी त्यात घट होऊन पारा १७.२ अंशांवर आला. त्यामुळे सायंकाळनंतर पुन्हा थंडीची हुडहुडी जाणवू लागली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 19, 2026 | 03:42 PM
कोल्हापुरातील तापमानात पुन्हा मोठी घट; ग्रामीण भागात गारठ्याची तीव्रता अधिक

कोल्हापुरातील तापमानात पुन्हा मोठी घट; ग्रामीण भागात गारठ्याची तीव्रता अधिक

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला; ग्रामीण भागात गारठा अधिक.
  • शहरातील किमान तापमान १८.३ वरून १७.२ अंश सेल्सिअसवर घसरले.
  • राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, आजरा, चंदगड आणि भुदरगडमध्ये थंडीची तीव्रता वाढली.
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून काहीशी कमी झालेली थंडी पुन्हा वाढू लागल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा गारठला आहे. विशेषतः ग्रामीण आणि डोंगराळ भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत असून, पहाटेच्या वेळी शेतशिवारात गार वारे आणि धुक्याची अनुभूती येत आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यांत रात्रीचा गारठा वाढला आहे. पहाटे शेतावर जाणारे शेतकरी, दूध संकलनासाठी बाहेर पडणारे दूध उत्पादक आणि मजुरांना थंडीचा सामना करावा लागत आहे.

कोल्हापूर शहरातील किमान तापमान दोन दिवसांपूर्वी १८.३ अंश सेल्सिअसवर गेले होते. मात्र, बुधवारी त्यात घट होऊन पारा १७.२ अंशांवर आला. त्यामुळे सायंकाळनंतर पुन्हा थंडीची हुडहुडी जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात शहराच्या तुलनेत मोकळ्या शेतशिवारामुळे रात्री आणि पहाटे गारवा अधिक जाणवत आहे. विशेषतः सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गगनबावडा, शाहूवाडी आणि चंदगड तालुक्यांतील डोंगराळ भागात थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पन्हाळा परिसरातही सकाळी थंड वाऱ्यांमुळे वातावरणात गारठा निर्माण होत आहे.

दरम्यान, शेतकरी पहाटेच शेतीच्या कामांसाठी बाहेर पडत असल्याने उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत. दूध संकलन, भाजीपाला वाहतूक आणि सकाळच्या बाजारपेठेवरही या थंडीचा परिणाम जाणवत आहे. दिवसा मात्र उन्ह काही प्रमाणात कायम आहे.

दुपारी काहीसा उकाडा

शहरातील कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने दुपारी काहीसा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळ्यासारखे वातावरण, तर रात्री हिवाळ्याची चाहूल असे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज असून, किमान तापमान १८ ते १९ अंशांच्या आसपास राहू शकते. त्यामुळे थंडीची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. शहरात रात्री गारठा, तर ग्रामीण भागात पहाटे हुडहुडी; बदलत्या हवामानामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा थंडीचा मुक्काम वाढल्याचे चित्र आहे.

FAQ

Q1. कोल्हापुरातील किमान तापमान किती नोंदवले गेले?
कोल्हापूर शहरात बुधवारी किमान तापमान १७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Q2. कोल्हापुरात थंडी कुठे अधिक जाणवत आहे?
ग्रामीण आणि डोंगराळ भागात थंडीची तीव्रता शहराच्या तुलनेत अधिक जाणवत आहे.

Q3. कोणत्या तालुक्यांमध्ये गारठा वाढला आहे?
राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यांत रात्रीचा गारठा वाढला आहे.

Web Title: Significant drop in temperature in kolhapur once again nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Temperature Increase

संबंधित बातम्या

Gokul Election : गोकुळचं राजकारण संपलं! आता मुंबई-पुण्यात दुधाला मिळणार सोन्याचा भाव? हसन मुश्रीफांनी सांगितला पुढचा प्लॅन!
1

Gokul Election : गोकुळचं राजकारण संपलं! आता मुंबई-पुण्यात दुधाला मिळणार सोन्याचा भाव? हसन मुश्रीफांनी सांगितला पुढचा प्लॅन!

Gokul Milk Price Hike: अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार; दरात २ रुपयांची वाढ होणार?
2

Gokul Milk Price Hike: अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार; दरात २ रुपयांची वाढ होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.