
सुखाने मरू तरी द्या! '... थोडं थांबलात तर बरे होईल'; चिपळूणमध्ये अंत्यदर्शनावेळी तूफान हाणामारी
चिपळुणात अंत्यदर्शनावेळी नातेवाईकांमध्ये हाणामारी
मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
चिपळूणच्या पिंपळी स्मशानभूमीतील घटना
चिपळूण: आपले नातेवाईक अंत्यदर्शनासाठी पाचच मिनिटांत येत आहेत, थोडा वेळ थांबलात तर बरे होईल, अशी विनवणी करणाऱ्या तरुणाला भर स्मशानभूमीत चौघांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळी (Chiplun)येथे घडली. यामध्ये फिर्यादी प्रशांत चव्हाण (३३, सध्या रा. आकले, चिपळुण, मुळ रा. कळकवणे, दादर, चिपळुण) हा जखमी झाला आहे. या मारहाण प्रकरणी किरण जाधव (सध्या रा. पिंपळी मळरा. पाटण, सातारा, मगट जाधव, अविनाश जाधव, सौरभजाधव (सर्व रा. तळदेव, महाबळेश्वर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे.
याबाबत प्रशांत चव्हाण सख्खी मामी कविता बाळु जाधवांचे अंत्यविधीकरीता पिंपळी खुर्द येथील स्मशानभुमीत गेले होते. त्यावेळी प्रशांत यांनी आई-वडील व इतर नातेवाईक थोड्याच अंतरावर असून ते येत आहेत, थोडा वेळ थांबा, त्यांना पण दर्शन होऊ द्या, असे सांगितले असता नातेवाईकांनी थांबायचे नाही, अग्नी द्या असे बोलु लागले. त्यावेळी तेथे जमलेल्या किरण जाधव व मगट जाधव याने शिवीगाळी केली. आरोपी किरण जाधव याने तेथेच असलेला दगड फिर्यादी यांचे डोक्यात मारला, तसेच आरोपी मगट व्यंकट जाधव, अविनाश मगट जाधव, सौरभ सुनिल जाधव यांनी फिर्यादी यांना हाताचे ठोशाने मारहाण केली.
Garuda Puran: मृत्यूपूर्वी पुढील जन्म कसा ठरवला जातो?
हिंदू पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे की, मनुष्य पृथ्वीवर जे काही कर्म करतो त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. गरुण पुराणानुसार मनुष्याच्या कर्माचा संपूर्ण हिशोब केला जातो. त्याचवेळी, जर आपण विचारले की सजीवाचा पुढील जन्म कसा ठरवला जातो, तर यालाही मनुष्याच्या कृती जबाबदार आहेत. माणसाचा पुढचा जन्म त्याच्या कर्माचा हिशेब झाल्यावरच ठरतो.
Garuda Puran: मृत्यूपूर्वी पुढील जन्म कसा ठरवला जातो?
गरुड पुराणानुसार महिलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्मात एक भयानक रोग होतो, ज्यामुळे तो पीडित राहतो. त्याच वेळी, ज्याचे अनैसर्गिक संबंध आहेत तो पुढच्या वेळी नपुंसक जन्माला येतो. गरुड पुराणानुसार जी व्यक्ती आयुष्यभर कुणाला ना कुणाला फसवत राहते त्याला पुढच्या जन्मात घुबडाची योनी मिळते. जर कोणी खोटी साक्ष दिली तर माणूस पुढच्या जन्मात आंधळा होतो.