Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वरच्या बांधकामांबाबत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; रिपब्लिकन पक्षाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम व शासन नियमांकडे महसूल व नगरपालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्यावतीने (आठवले) प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना देण्यात आले.

  • By Aparna
Updated On: Oct 01, 2023 | 04:41 PM
महाबळेश्वरच्या बांधकामांबाबत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; रिपब्लिकन पक्षाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
Follow Us
Close
Follow Us:
वाई : महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम व शासन नियमांकडे महसूल व नगरपालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्यावतीने (आठवले) प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व शासन नियमांना केराची टोपली दाखवत महसूल
व नगरपालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही सर्व अवैध बांधकामे राजरोसपण सुरु आहेत. यलो झोन, ग्रीन झोन यासाठी केलेली
नियमावली निव्वळ कागदावरच राहिली आहे. महसूल व नगरपालिका अधिकारी यांच्या कृपेने पाचगणी ते महाबळेश्वर या ठिकाणावर कुठेही बांधकाम करा, त्यासाठी झाडी तोडायची असेल तरी तोडण्यास याच अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळते. डोंगराच्या उतारावर बांधकाम करायचे असेल तरी सर्व गोष्टी कागदोपत्री करेक्ट या विभागांमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याचेच फलित हे आता होत असणारे भूस्खलन आहे.
छोटासा पाऊस झाला तरी लगेच होणारे भूस्खलन ही या भागात होत असणाऱ्या अवैध बांधकामांमुळे हाणारा परिणाम आहे. त्यामुळे या भागामध्ये झालेल्या बांधकामांमुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी झाल्यास हे सर्व अधिकारी जबाबदार असतील या सर्व अधिकाऱ्यांच्या बदली होऊन जरी गेला असेल तरी  कामांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या प्रकारे कार्यवाही न झाल्यास संबंधितावर  कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अशोक गायकवाड, स्वप्निल गायकवाड, श्रीकांत निकाळजे, जॉन जोसेफ, अतिश भोसले, सागर शिंदे, गणेश सावंत तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: File a case against the authorities regarding constructions of mahabaleshwar a statement from the republican party to state officials nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2023 | 04:41 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara News
  • Wai

संबंधित बातम्या

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
1

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
2

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार
3

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक
4

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.