आला रे आला! खवय्यांसाठी आनंदाची बातमी; कोकणातून आंब्याची पहिली पेटी APMC मध्ये दाखल, दर किती?
मुंबई: कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोकणातून आंब्याची पहिली पेटी मुंबईची बाजारांपेठेत दाखल झाली आहे. दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिना आला की आंब्याच्या पेट्या बाजारात येण्यास सुरुवात होते. आंबा हा फळांचा राजा आहे. कोकणातील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. दरम्यान डिसेंबर, जानेवारी महिन्यात मुंबई. पुण्यात पहिली पेटी दाखल होत असते. या दरम्यान नवी मुंबईच्या एपीएमसीच्या बाजारात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे.
यंदा थोडा मधल्या काळात पाऊस झाल्याने आंबा थोडा उशिरा आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आंब्याचा सीझन हा थोडासा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान आंब्याची पहिली पेटी मुंबईच्या बाजारात दाखल झाल्यानंतर त्या पेटीची पूजा देखील करण्यात आली आहे. यंदा नवी मुंबईच्या एपीएमसीच्या बाजारात कोकणातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे.
कोकणातील देवगड येथून आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे. केसर आंब्याची पेटी मुंबईतील बाजारात दाखल झाली आहे. देवगड येथून केसर आंब्याची पेटी मुंबईच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. बाजारपेठेत दाखल होताच या पेटीची पूजा देखील करण्यात आली आहे. यंदा पाऊसकाळ चांगला झाला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस झाला आहे.
त्यानंतर अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली. यामुळे कोकणातील आंब्याची पेतील थोडीशी उशिराने मुंबईच्या बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे यंदा आंब्याच्या हंगामास उशीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी फेब्रुवारी ऐवजी मार्च महिन्यात आंब्याकहा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. कोकणातील आंबा हा जगभर प्रसिद्ध आहे. हापूस खाण्यासाठी लोक आतुर असतात. मात्र यंदा हापूस ऐवजी केसर आंब्याने या हंगामची सुरुवात झाली आहे.
हेही वाचा: देवगड हापूस आंब्याची हंगामातील पहिली पेटी बाजारात; एका पेटीस तब्बल ‘इतका’ भाव
देवगड येथील एका शेतकऱ्याने विक्रीसाठी मुंबईच्या बाजारात केसर आंब्याची पेटी आणली आहे. 2025 च्या हंगामातील ही पहिली आंब्याची पहिली पेटी आहे. आंब्याची पेटी मुंबईत दाखल होताच त्याची पूजा देखील करण्यात आली आहे. या आंब्याच्या पेटीला अंदाजे 15 ते 16 हजार रुपयांचा दर मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी कोण खरेदी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईपाठोपाठ पुण्याच्या बाजार पेठेत देखील आंब्याची पेटी लवकरच दाखल होणार आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच पेटी दाखल झाली आहे. आंबा हंगमामध्ये मुहूर्ताला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. साधारण मार्च महिन्यापासून आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी पहिला मान हा हापूस आंब्याऐवजी ‘केसर’ आंब्याला मिळाला आहे. लवकरच हापूस आंब्याची पेटी देखील मुंबई आणि पुणे बाजारपेठेत दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वजण आता या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.