
first std class will get a separate book every three months starting from this academic year
शिरपूर : पहिलीच्या लहान मुलांच्या पाठिवरील चार पुस्तकांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून दर तीन महिन्यांनी एक नवीन पुस्तक मुलांच्या हाती येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तकाबाबत मुलांमध्ये उत्सकुता लागलेली आहे. एकात्मिक व द्विभाषिक बालभारती इयत्ता पहिली मराठी माध्यम १,२,३,४ अशा चार भागांमध्ये विद्यार्थ्यांना हे पुस्तक दिले जाणार आहे. दर तीन महिन्यांनी वेगळे पुस्तक दिले जाणार आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी असलेले पुस्तक यंदाच्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
यामध्ये भारताचे संविधान, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये, खायला काय आवडते, मानवाचे अवयव, ज्ञानद्रिये ओळख, स्वच्छतेसाठी कोण मदत करते, चांगल्या सवयी कोणत्या, छोटेभाऊ बहिण, दिनचर्या, विज्ञान, कार्यानुभव, मी आणि माझे कुटुंब, प्राणी, वाहतूक तसेच कृती खेळ, चित्रकला, गोष्टी, गाणी यांचा उपयोग करून पुस्तकातून अध्ययन आणि अध्यापन केले जाणार आहे. गेल्या वर्षी शैक्षणिक वर्षात बालभारती, इंग्रजी, गणित व खेळ अशी चार पुस्तके होती. दप्तराचे ओेझे कमी करण्याकरिता शासनाने चार पुस्तकांऐवजी एका पुस्तकांची निर्मिती केली आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी वापरलेले पुस्तक घरी ठेवले जाणार आहे. शाळेत जाताना विद्यार्थ्यांनी एकच पुस्तक आणायचे आहे. वर्षभर चार भागात ते शिकविले जाणार आहे.
पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या भावविश्वात निगडीत जोड
या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि भावविश्वाशी निगडीत असलेल्या चित्रांना तसेच प्राणी माझे, कुटुंब, पाणी, खेळ, अनुभव यांना जोड देण्यात आलेली आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्ये असलेले हे पुस्तक आहे. अशी माहिती शिरपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक निलेश शिंदे यांनी दिली.