Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: पोलिसांची कारवाई, ६ चोरटे सापडले तावडीत! तब्बल साडे ९ लाखांचा माल जप्त

वाशिम पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील ७ गंभीर गुन्ह्यांची उकल करत ६ सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी सोने, रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण ९ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 01, 2026 | 02:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि लुटमारीच्या घटनांनी नागरिक दहशतीत होते. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिलेल्या कडक आदेशानुसार, वाशिम पोलिसांनी विशेष मोहीम राबवून सात गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६ सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ९ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Baramati Airport plane Crash History: बारामती विमानतळ अपघातांचा भयावह इतिहास; आधीचे प्लेन क्रॅश अहवाल गुलदस्त्यात!

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, घरफोडीतील सोने विकण्यासाठी काही चोरटे वाशिममध्ये येणार होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मालेगाव तालुक्यातील खेर्डा येथील करण एकनाथ वंजारे याला त्याच्या साथीदारासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३८ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल आणि दोन मोबाईल असा ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान त्यांनी वाशिमसह बुलढाणा जिल्ह्यातही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

दुसऱ्या एका कारवाईत, समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या डिझेल चोरीवाशिम पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील ७ गंभीर गुन्ह्यांची उकल करत ६ सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी सोने, रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण ९ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.चे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी जालना जिल्ह्यातील हिवरा आणि टेंभुर्णी येथील प्रतिक साळवे, सागर हिवराळे आणि अलीम खान पठाण या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच, मालेगाव परिसरात पाकीटमारी करणाऱ्या शेख सत्तार शेख दादामिया या सराईत गुन्हेगारालाही पोलिसांनी बेड्या ठोकून त्याच्याकडून रोख रक्कम हस्तगत केली आहे.

Pune ZP Election 2026 : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव 

ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी आणि नवदीप असावाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी व त्यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Washim news police action 6 thieves caught

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Washim
  • Washim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.