Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : शेंदूरजना रस्त्यासाठी नागरिकांचे उपोषण! दुरुस्तीच्या आश्वासनानंतर उपोषण घेतले मागे

शेलूबाजार–शेंदूरजना मोरे हा वर्दळीचा रस्ता खड्ड्यांनी भरल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 01, 2026 | 02:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदूरजना मोरे हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी शुक्रवार (दि. ३०) पासून शेलूबाजार–शेंदूरजना मोरे रस्त्यावर उपोषण सुरू केले होते.

पुणे शहरातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश; जाणून घ्या निरिक्षकांची सविस्तर नावे

या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटत असल्याने अनेक अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिक आणि वाहनचालक जखमी झाले आहेत. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, शेतकरी आणि दैनंदिन प्रवासी यांना दररोज जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा निवेदने दिली होती. मात्र, दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेंदूरजना मोरे, नांदखेडा तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

नागरिकांच्या उपोषणाची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच मंगरुळपीरचे तहसीलदार यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी आमदार श्याम खोडे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून आंदोलक नागरिकांशी संवाद साधला. अधिकाऱ्यांनी नागरिकांना तातडीने दिलासा देत उद्यापासून रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, हा रस्ता आगामी अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला असून, मंजुरी मिळताच नवीन रस्त्याचे काम हाती घेतले जाईल, असे लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर नागरिकांनी आपले उपोषण मागे घेतले.

सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा! जिल्हाधिकारी मीना यांचे निर्देश; जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती मोहीम

उपोषणस्थळी शेंदूरजना मोरे, नांदखेडा परिसरातील नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मात्र, यापुढे केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून, प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला आहे. एकूणच, शेलूबाजार शेंदूरजना मोरे रस्त्याच्या प्रश्नामुळे प्रशासनाला अखेर जाग येत उपोषणाची दखल घ्यावी लागली असून, आता दिलेली आश्वासने किती लवकर प्रत्यक्षात उतरतात, याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Citizens hunger strike for the shendurjana road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Washim
  • Washim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.