Flower decorations at Pandharpur temple for Vitthal Rukmini wedding ceremony
पंढरपूर : पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. पंढरी म्हणजे वारकऱ्यांसाठी माहेर आहे. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत असतो. या वर्षी देखील या शाही सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रत्येक सणाला आणि विशेष दिवसांना फुलांच्या आकर्षक सजावट केली जाते. यावेळी देखील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळाच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची आरास आणि सजावट करण्यात आली आहे. यामध्ये जिप्सी, डिजी, सुर्यफुल, गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जरबरा, ऑर्किङ जिनेियम, तगर, गुलछडी, कामिनी, तुक्स, गोंडा (लाल पिवळा) बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, डीर्शना इत्यादी फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. संपूर्ण मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि १ टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
श्रींचा गाभारा, विठ्ठल सभामंडप, श्री संत नामदेव महाराज पायरी, उत्तर द्वार (VIP Gate), सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. याकरिता सुमारे 100 स्वयंसेवकानी परिश्रम घेतले असून, सदरची सजावट पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा