Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या देशभूमीवर; देहूतून संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे भव्य हस्तांतरण

संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. उपस्थित वारकरी, भाविक आणि विश्वस्तांच्या डोळ्यांत भक्तीचे अश्रू तर ओठांवर विठ्ठलनामाचा जयघोष होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2026 | 07:55 AM
विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या देशभूमीवर; देहूतून संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे भव्य हस्तांतरण

विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या देशभूमीवर; देहूतून संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे भव्य हस्तांतरण

Follow Us
Follow Us:

देहूगांव / बद्रीनारायण घुगे : जगद्गुरू संत परंपरेचा जागतिक सन्मान करणारा ऐतिहासिक क्षण शुक्रवारी (दि.१३) देहू नगरीत अनुभवायला मिळाला. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची जर्मनीतील विठ्ठल धाम येथे उभारण्यात आलेल्या भगवान विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापना होणार असून, त्या मूर्तीचे देहू देवस्थान संस्थानच्या वतीने विधिवत पूजन करून भावपूर्ण वातावरणात हस्तांतरण करण्यात आले.

शुक्रवारी दुपारी तीन वाजता टाळ-मृदुंगाच्या गजरात, “ज्ञानेश्वर माऊली तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल” या नामघोषात हा सोहळा पार पडला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. उपस्थित वारकरी, भाविक आणि विश्वस्तांच्या डोळ्यांत भक्तीचे अश्रू तर ओठांवर विठ्ठलनामाचा जयघोष होता. हा सोहळा केवळ संस्थानपुरता मर्यादित नसून, प्रत्येक मराठी मनाचा आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा अभिमानाचा क्षण ठरला. आपल्या लाडक्या तुकोबांची मूर्ती जर्मनीच्या भूमीवर जाणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह आणि समाधानाची भावना व्यक्त होत होती.

हेदेखील वाचा : Rangbhari Ekadashi 2026: रंगभरी एकादशी कधी आहे? जाणून घ्या पूजेची वेळ, पद्धत आणि महत्त्व

माघ वद्य एकादशी या अत्यंत मंगल दिवशी हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त तसेच समस्त वारकरी भाविकांच्या साक्षीने मूर्तीचे विधिवत मंगेश पाटील यांच्या हस्ते देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे , गणेश महाराज मोरे ,संजय बाप्पू बालवडकर , पी.आर .पाटील, (पंढरपूर), माजी विश्वस्त नितीन महाराज मोरे व वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थित पूजा व आरती करण्यात आली. ही संत तुकाराम महाराजांची मूर्ती संजय आंबेकर (औंध) हे जर्मनीला घेऊन जाणार आहेत.

चिखली येथील मूर्तिकार सतीश हिंगे यांनी ही दोन फूट उंचीची आकर्षक मूर्ती काळ्या पाषाणापासून घडवली असून, जर्मनी येथील ख्रिर्षहाईम येथील विठ्ठलधाम मंदिरात अक्षय तृतीया १९ एप्रिल २०२६ रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे , माजी विश्वस्त नितीन महाराज मोरे ,सुनील महाराज मोरे ,सूर्यकांत मोरे , तसेच सुरेश काळोखे त्यांची पत्नी सुरेखा काळोखे सुनील झेंडे ,त्यांची पत्नी मीना झेंडे ,श्रीकांत पाटील , संजय बालवडकर , रथाचे मानकरी सतीश सोलंकी ,आदीसह चाळीस भाविक भक्त जर्मनीला जाणार आहेत.

देहूतून जर्मनीपर्यंत विठ्ठलनामाचा गजर पोहोचणार असून, संत परंपरेचा संदेश आता सातासमुद्रापारही घुमणार आहे. वारकरी संप्रदायासाठी हा क्षण अभिमानाचा आणि इतिहासात नोंदवला जाणारा ठरला आहे.

Web Title: The name vitthal is now heard in germany

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 07:55 AM

Topics:  

  • pune news
  • Vitthal Rukmini Mandir

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
1

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
2

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
3

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
4

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.