Former ATS officer Mehboob Mujawar claims plan to arrest RSS Mohan Bhagwat in Malegaon blast case
Mohan Bhagwat in Malegaon blast case : नाशिक : महाराष्ट्रातील मालेगावमध्ये रमजानच्या आदल्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. मालेगाव येथील भिक्कू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल हाती आला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आता नवा ट्वीस्ट आला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना गोवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
भगवा दहशतवाद स्थापित करणे हाच उद्देश होता: मुजावर
भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूरसह सर्व सात आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयावर निवृत्त निरीक्षक मेहबूब मुजावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवृत्त निरीक्षक मेहबूब मुजावर म्हणाले की, संघ प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचा आदेश त्यावेळी मला देण्यात आला होता. भगवा दहशतवाद स्थापित करण्याच्या उद्देशाने हा आदेश देण्यात आला होता, असा मोठा दावा मेहबूब मुजावर यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोलापूरमध्ये संवाद साधताना मेहबूब मुजावर म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाने एटीएसच्या फसवणुकीला नकार दिला आहे. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास एटीएसने केला होता, परंतु नंतर तो राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेत मुजावर म्हणाले की, या निर्णयामुळे एका बनावट अधिकाऱ्याने केलेल्या बनावट तपासाचा पर्दाफाश झाला आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या मालेगाव स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०१ जण जखमी झाले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एटीएस पथकामध्ये मेहबूब मुजावर होते, असे त्यांनी सांगितले आहे. आता त्यांनी निकाल हाती आल्यानंतर मोहन भागवत यांना पकडण्यास सांगण्यात आले असल्याचा दावा केला आहे.
माजी एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएसने त्यावेळी काय आणि का तपास केला हे मी सांगू शकत नाही… पण मला राम कलसांगरा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांसारख्या व्यक्तिमत्त्वांबद्दल काही गोपनीय आदेश देण्यात आले होते. हे सर्व आदेश असे नव्हते की त्यांचे पालन करता येईल.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुजावर म्हणाले की, प्रत्यक्षात त्यांना वास्तव माहित असल्याने त्यांनी त्यांचे अनुसरण केले नाही. मोहन भागवतांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला पकडणे माझ्या क्षमतेबाहेर आहे, असे देखील ते म्हणाले आहेत. मी आदेशांचे पालन न केल्यामुळे, माझ्यावर खोटा खटला दाखल करण्यात आला आणि त्यामुळे माझे ४० वर्षांचे करिअर उद्ध्वस्त झाले.
माजी पोलिस अधिकारी मेहबूब मुजावर म्हणाले की त्यांच्याकडे त्यांच्या दाव्यांना समर्थन देण्यासाठी कागदोपत्री पुरावे आहेत. ते म्हणाले की भगवा दहशतवाद नव्हता. सगळं बनावट होतं, असा मोठा खळबळजनक दावा मेहबूब मुजावर यांन केला आहे.