Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election: कराड दक्षिणमध्ये ‘अतुल’पर्व; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव

Maharashtra Election 2024: सकाळी आठ वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 23, 2024 | 06:16 PM
Maharashtra Election: कराड दक्षिणमध्ये 'अतुल'पर्व; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव

Maharashtra Election: कराड दक्षिणमध्ये 'अतुल'पर्व; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव

Follow Us
Close
Follow Us:

कराड: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला. याठिकाणी भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले यांना 1 लाख 39 हजार 505 मते मिळाली. तर विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मते मिळाली. यामध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचा 39 हजार 355 मतांनी विजयी झाला. कराड दक्षिण हा काँग्रेसचा असलेला पारंपरिक गड नेस्तनाबूत करत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने हा निकाल राज्याच्या राजकारणात अधोरेखित झाला आहे.

प्रारंभी, सकाळी आठ वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 1590 मतांचे लीड घेतले. त्यानंतर सहाव्या आणि दहाव्या फेरीत पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर घेतलेल्या अल्प मतांचे लीड मोडीत काढत शेवटपर्यंत निर्णायक आघाडी घेतली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असलेल्या माजी मंत्री स्व. विलासकाका पाटील – उंडाळकर यांचे पुत्र, रयत संघटनेचे नेते अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्या बालेकिल्ला असलेल्या उंडाळे भागात डॉ. अतुलबाबा भोसले यांना अनपेक्षित लीड मिळाले. त्यामुळे या ठिकाणाहून पृथ्वीराज चव्हाण यांना मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर कराड शहरासह मलकापूर आणि सैदापूरमधील सुज्ञ मतदार पृथ्वीराज चव्हाण यांची पाठराखण करतील, ही अपेक्षाही धुळीस मिळाली. या ठिकाणी डॉक्टर अतुल भाऊ भोसले यांनी आघाडी घेतली.

हेही वाचा:  Maharashtra Election 2024: जे ‘वस्तादा’ला जमलं नाही ते ‘पठ्ठ्यानं करून दाखवलं; फडणवीसांची विजयाची हॅट्रिक

डॉ. अतुल भोसले यांचा बालेकिल्ला असलेल्या रेठरे बुद्रुकसह कृष्णाकाठच्या गावांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना तब्बल 10 हजार मतांची लीड दिले. येथेच डॉ. अतुल भोसले यांचा विजय निश्चित झाला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजीस सुरुवात केली. त्यानंतर निकालाचे औपचारिकता बाकी राहिल्याने सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी काढता पाय घेतला. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना विजयी उमेदवार घोषित केले. त्यांना 1 लाख 39 हजार 505 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मते मिळाली. यामध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचा 39 हजार 355 मतांनी विजयी झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाचे उजळणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन

विजयी उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह विजय रॅली काढली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उजळण करत फटाक्यांची आत शिवाजी करत मोठा जल्लोष केला. त्यानंतर ही रॅली कराड शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात आल्यानंतर याठिकाणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

समर्थक, कार्यकर्त्यांचा जल्लोष

डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 15 हजार मतांचे निर्णय लीड घेतल्यानंतर कृष्णा हॉस्पिटल येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत डॉ. अतुलबाबांच्या विजयार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विजयी रॅली काढण्यात आली. यामध्ये डॉल्बी व डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. ही रॅली महामार्गावरून कराड शहरात येताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Former cm pruthviraj chvhan loss at karad and dr atul bhosale won that seat for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 06:16 PM

Topics:  

  • Dr Atul Bhosale
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश
4

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.