Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीची चौकशी हवी; आ रमेश कराड यांची केंद्र सरकारकडे मागणी

काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 15, 2022 | 01:57 PM
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीची चौकशी हवी; आ रमेश कराड यांची केंद्र सरकारकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

लातूर : काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी केली आहे.

सन २००७ ते २०१७ या काळात हमीद अन्सारी हे देशाचे उपराष्ट्रपती होते. याच काळात त्यांच्या निमंत्रणावरून भारतात पत्रकार या नात्याने दौरे करताना भारतातील महत्वाची गोपनीय माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून मिळविल्याचा गंभीर गौप्यस्फोट नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे. एकदा दोनदा नव्हे, तर तब्बल पाच वेळा अन्सारी यांनी वेगवेगळ्या निमित्ताने मिर्झा यांना भारतात निमंत्रित केले होते. या भेटीत मिळविलेली माहिती आपण आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीला पुरवत होतो, असे मिर्झा यांनी म्हटले आहे. भारताच्या प्रत्येक शहरात पाकिस्तानी गुप्तहेरांचे जाळे पसरले असल्याचेही मिर्झा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे, मिर्झा आणि हमीद अन्सारी यांच्यातील संबंधांचा खुलासा होणे जरूरीचे असून त्यासाठी अन्सारी यांची चौकशी केली जावी अशी मागणी कराड यांनी केली.

इराणचे राजदूत म्हणून देखील अन्सारी यांची कारकिर्द संशयास्पद असल्याचा आरोप केला जात असून देशाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता या आरोपांची तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे, हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपतीपदावर नेमणूक करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाची देखील चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी कराड यांनी केली.

[read_also content=”संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अडवला अजित पवारांचा ताफा, काय आहे कारण ? https://www.navarashtra.com/maharashtra/angry-activists-blocked-ajit-pawars-convoy-what-is-the-reason-304431.html”]

देशाच्या सुरक्षिततेस बाधा येऊ शकेल अशी माहिती शत्रूराष्ट्रास पुरविण्याचा आरोप घटनात्मक पदावरील व्यक्तीवर होणे ही चिंताजनक बाब असल्याने अन्सारी यांच्या संपूर्ण कारकिर्दीची चौकशी करून केंद्र सरकारने सत्य उजेडात आणले पाहिजे. तसेच त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने अन्सारी यांच्या नेमणुकीमागील भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही आ. रमेश कराड यांनी बोलून दाखविले.

Web Title: Former vice president hamid ansaris career should be probed and ramesh karads demand to the central government nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2022 | 01:57 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Latur news
  • narendra modi
  • ramesh karad

संबंधित बातम्या

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP
1

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी
2

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात
3

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला
4

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.