Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न, आमदारकीपासून ते निवृत्तीच्या घोषणेपर्यंत ‘त्या’ कायम शरद पवारांसोबत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Supremo Sharad Pawar) यांनी आज ‘लोक माझे सांगाती’च्या (Lok Maze Sangati) पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर (Retiremenr Announcement) सर्वांना धक्काच बसला आहे.

  • By Aparna
Updated On: May 02, 2023 | 06:59 PM
लग्न, आमदारकीपासून ते निवृत्तीच्या घोषणेपर्यंत ‘त्या’ कायम शरद पवारांसोबत
Follow Us
Close
Follow Us:
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Supremo Sharad Pawar) यांनी आज ‘लोक माझे सांगाती’च्या (Lok Maze Sangati) पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर (Retiremenr Announcement) सर्वांना धक्काच बसला आहे. काहींनी आश्चर्य व्यक्त केलं असून कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्याच अनेक नेत्यांना शरद पवारांचा हा निर्णय पूर्णपणे पटलेला नाही. अनेकांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली असून कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसू लागले आहेत. अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या निर्णयाविरोधात राजीनाम्याचं हत्यार उपसत आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.या सगळ्या  गोंधळात एक व्यक्ती शरद पवारांच्या शेजारी बसून सर्व शांतपणे पाहत होत्या. त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीनाहीतर खुद्द शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार होय.
१९६७ साली शरद पवारांच्या आयुष्यात प्रतिभाताई आल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच वर्षी त्यांना आधी आमदारकी मिळाली आणि त्यानंतर त्यांना प्रतिभाताईचं स्थळ आलं.प्रतिभा पवार या क्रिकेटपटू सदू शिंदे यांची मुलगी आहेत. तसेच शरद पवारांचे मोठे भाऊ माधवराव पवार यांचे घनिष्ठ मित्र अरविंद राणे यांच्या प्रतिभाताई भाची. अरविंद राणे यांनीच शरद पवारांसाठी प्रतिभा यांचं स्थळ सुचवलं.
लग्नासाठी तयार नव्हते शरद पवार
नुसतीच आमदारकी मिळाल्याने शरद पवार आधी लग्नासाठी तयार नव्हते. मात्र आईच्या आग्रहाखातर मुलगी पाहण्यासाठी तयार झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतिभाताई यांना न पाहाताच शरद पवारांनी लग्नासाठी होकार दिला होता. असं सांगितलं जातं की जेव्हा मुलगी पाहायला गेले तेव्हा ते मुलीला न पाहाता वर्तमानपत्र वाचत बसले होते.त्यानंतर १ ऑगस्ट १९६७ रोजी शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांनी लग्न केलं. लग्न यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक आल्यानंतरच लावायचं असं ठरलं होतं. त्यामुळे लग्नाच्या दिवशीही शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते.
संयम बाळगून बायकोनी दिली साथ
अखेर संध्याकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक लग्नमंडपात आले, तेव्हा शरद पवार व प्रतिभा पवार यांचा विवाह पार पडला. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर प्रतिभाताई पवार शरद पवार यांना म्हणाल्या होत्या की, आणखी दहा मिनिटं उशीर झाला असता तर त्या तिथेच कोसळल्या असत्या.
एका मुलाखतीत प्रतिभा यांनी सांगितले होते की, लग्नाआधी शरद पवारांनी त्यांच्यासमोर एकच मूल देण्याची अट ठेवली होती. मग तो मुलगा असोत किंवा मुलगी. त्याकाळी देखील शरद पवरांनी एक मुलाचा निर्णय घतला हे खरंच कौतुकास्पद आहे.
शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना एक मुलगी आहे सुप्रिया. त्या सुद्धा वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून राजकारणात उतरल्या आहे. शरद पवार आणि प्रतिभाताई यांच्या ५६ वर्षाच्या संसारात अनेक चढ उतार आले.कधी राजकारणात तर कधी वैयक्तीक आयुष्यात पण प्रतिभाताई खंबीरपणे त्यांच्यासोबत राहल्या. राजकारणातील सत्तापालट असो की, शरद पवारांचं आजारपण त्या नेहमीच तटस्थ खंबीर राहल्या.एका मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले होते की माझ्या बायकोने नेसलेल्या प्रत्येक साड्यांची निवड मी करतो. त्यावरुन त्याचं प्रतिभाताईविषयीचं प्रेम प्रखरपणे दिसून येतं.
आज शरद पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठी घोषणा केली तेव्हा देखील त्या त्यांच्या सोबत होत्या. अगदी संयमीपद्धतीने त्यांनी कार्यकर्त्याच्या भावना समजून घेत त्यांचे म्हणणे ऐकले.
त्या घोषणेवरून कार्यकर्त्यांना फटकारले
शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सभागृहात मोठा गोंधळ सुरू झाला. त्यानंतर त्यांना विनंती केल्यानंतरही त्यांनी निर्णय मागे न घेतल्यामुळे पुन्हा आवाज सुरू झाले. त्यानंतर गर्दीतून एक आवाज आला ‘साहेब मोदीला जर हाकलायचं असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही’ या आवाजानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार चिडल्याचे दिसून आलं. तर शरद पवार यांनी हात वर करत त्यांना थांबवलं.

Web Title: From marriage mla to retirement announcement she is always with sharad pawar nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2023 | 06:59 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Pratibha Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Election Result 2025 : चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान
1

Maharashtra Local Body Election Result 2025 : चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान

Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व
2

Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व

पिंपरी- चिंचवडमध्येही राजकीय भूकंप; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
3

पिंपरी- चिंचवडमध्येही राजकीय भूकंप; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Local Body Election Result 2025 : श्रीवर्धन नगरपरिषदेत तटकरेंना मोठा धक्का, उबाठाचे अतुल चौगुले नगराध्यक्षपदी विजयी
4

Maharashtra Local Body Election Result 2025 : श्रीवर्धन नगरपरिषदेत तटकरेंना मोठा धक्का, उबाठाचे अतुल चौगुले नगराध्यक्षपदी विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.