Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: रेल्वेतील एफटी कोट्याचा झाला गैरवापर! ३९ प्रकरणांत ३.५६ लाखांचा दंड; १२१ प्रवाशांवर कारवाईचा बडगा

तिकीट तपासणी पथकाने विशेष मोहीम राबवून या तिकिटांची पडताळणी केली असता ३९ पीएनआर संशयास्पद आढळले. या कारवाईदरम्यान संबंधित प्रवाशांकडून नियमांनुसार दंड आकारण्यात आला.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2026 | 11:00 AM
रेल्वेतील एफटी कोट्याचा झाला गैरवापर! ३९ प्रकरणांत ३.५६ लाखांचा दंड; १२१ प्रवाशांवर कारवाईचा बडगा

रेल्वेतील एफटी कोट्याचा झाला गैरवापर! ३९ प्रकरणांत ३.५६ लाखांचा दंड; १२१ प्रवाशांवर कारवाईचा बडगा

Follow Us
Follow Us:

विदेशी पर्यटकांसाठी राखीव असलेल्या ‘फॉरन टुरिस्ट कोटा’चा (एफटी कोटा) गैरवापर करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने कडक कारवाई सुरू केली असून, ३९ प्रकरणांत तब्बल ३ लाख ५६ हजार ९१६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान १२१ प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळून आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.वैध कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिक विदेशी कोट्यातून तिकीट काढून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मध्य रेल्वेने ही मोहीम तीव्र केली. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी गाडी क्रमांक १२२९६ ‘संगमित्रा एक्सप्रेस’ मध्ये हा प्रकार उघडकीस आला. काही भारतीय प्रवासी आवश्यक विदेशी कागदपत्रांशिवाय एफटी कोट्याच्या तिकिटांवर प्रवास करताना आढळले. त्यानंतर एफटी कोट्यातील भविष्यातील आरक्षणांचा सखोल आढावा घेण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai News: औषध विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात! ई-फार्मसीला विरोध, मेडिकल चालकांचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

२४ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत ३१ गाड्यांमध्ये रेल्वेकडून १७४ मूळ पीएनआर विदेशी कोट्याअंतर्गत जारी झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. तिकीट तपासणी पथकाने विशेष मोहीम राबवून या तिकिटांची पडताळणी केली असता ३९ पीएनआर संशयास्पद आढळले. या कारवाईदरम्यान संबंधित प्रवाशांकडून नियमांनुसार दंड आकारण्यात आला. तसेच या प्रवाशांना त्यांच्या राखीव बर्थवर बसण्याची परवानगी नाकारून त्या जागा आरएसी व प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना देण्यात आल्या.

मध्य रेल्वेने मागितला आयआरसीटीसीकडे अहवाल:

विदेशी पर्यटक कोट्याअंतर्गत प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीत साधारणतः चार आसने राखीच ठेवली जातात. मात्र, काही प्रवाशांनी नियम धाब्यावर बसवून या सुविधेचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात अधिकृत बुकिंग एजंटचा सहभाग आहे का? याबाबत माहिती मिळवण्यासाठी आयआरसीटीसीकडे तपशील मागवण्यात आला असून, तपास सुरू असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Mumbai News: मुंबईकरांचे पाणी आता अधिक शुद्ध होणार! जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार

अयोग्य कोट्यातून तिकीट बुक करणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना योग्य कोट्यातूनच तिकीट काढण्याचे आवाहन केले असून आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवण्याचेही सांगितले आहे. तसेच अशा प्रकारची माहिती ‘१३९’ हेल्पलाईन किंवा ‘रेल मदत ॲपद्वारे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Ft quota in the railway was misused 3 56 lakh fine in 39 cases action against 121 passengers mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Local Trains
  • Mumabi

संबंधित बातम्या

सिंहगड एक्सप्रेससह अनेक लोकल रद्द, काही गाड्या उशिराने धावणार; रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम
1

सिंहगड एक्सप्रेससह अनेक लोकल रद्द, काही गाड्या उशिराने धावणार; रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

मुंबईकरांना मोठा झटका! 29 जूनपासून बदलणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक; ‘एसी’साठी १२ लोकल करणार बंद
2

मुंबईकरांना मोठा झटका! 29 जूनपासून बदलणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक; ‘एसी’साठी १२ लोकल करणार बंद

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात
3

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.