Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशभक्तांसाठी खूशखबर, मध्य आणि हार्बर मार्गावर रात्रीच्या विशेष फेऱ्या, असं असेल लोकलचे वेळापत्रक

गणेशभक्तांसाठी खूशखबर असून आता गणपती पाहण्यासाठी बाहेर पडल्यानंतर परतण्याची चिंता करण्याचं कारण नाही. कारण मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आता रात्रभर तुमच्या सोयीसाठी असणार आहे. जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 14, 2024 | 01:00 PM
मध्य आणि हार्बर मार्गावर रात्रीच्या विशेष फेऱ्या, असं असेल लोकलचे वेळापत्रक (फोटो सौजन्य-X )

मध्य आणि हार्बर मार्गावर रात्रीच्या विशेष फेऱ्या, असं असेल लोकलचे वेळापत्रक (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात गणेश चतुर्थी उत्सव जेवढ्या जल्लोशात साजरा केला जातो, तेवढ्याच उत्सहात गणपथी विसर्जन देखील केले जाते. विशेषतः मुंबईत विसर्जनासाठी हजारोंची गर्दी रस्त्यावर जमा होते. यंदा १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी येत असून या दिवशी भाविकांच्या सोईसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. १७/१८ सप्टेंबरच्या रात्री गणेश विसर्जनासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकर भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत.

विसर्जनादिवशी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहे. या गाड्या चर्चगेट आणि विरार दरम्यान १७ आणि १८ च्या मध्यरात्री सोडल्या जातील. या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर 14 ते 16 सप्टेंबर या 3 दिवसांत एकूण 22 रात्रकालीन विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष फेऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सीएसएमटी-ठाणे-सीएसएमटी आणि सीएसएमटी-पनवेल-सीएसएमटी या मार्गांवर असतील. शनिवार, रविवार आणि मंगळवारी मध्यरात्रीनंतर या लोकल धावणार आहेत.

विशेष लोकल फेऱ्या (14-15, 15-16, 17-18 सप्टेंबरच्या मध्यरात्री )

सीएसएमटी ते कल्याण – 1.40 आणि 3.25 (प्रत्येक दिवशी 2 फेऱ्या)
सीएसएमटी ते ठाणे – 2.30
कल्याण ते सीएसएमटी – 12.05
ठाणे ते सीएसएमटी – 1.00आणि 2.00 (प्रत्येक दिवशी 2 फेऱ्या)

मध्यरात्रीनंतर विशेष लोकल फेऱ्या (१७-१८ सप्टेंबरच्या मध्यरात्री)

सीएसएमटी ते पनवेल – १.३०, २.४५
पनवेल ते सीएसएमटी – १.००, १.४५

मेट्रो ही सज्ज

भाविकांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ने देखील पाऊल उचलले आहे. गणपती उत्सवादरम्यान मेट्रो ट्रेनची दैनंदीन सेवेचा वेळ वाढवण्याची घोषणा मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यानुसार गणेश उत्सवाच्या काळात अंधेरी पश्चिम आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवर शेवटची मेट्रो 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान रात्री 11.30 वाजेपर्यंत धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच यावेळी दोन्ही टर्मिनल्सवरून रात्री 11.15 आणि 11.30 वाजता अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत. गुंदवली आणि दहिसर (पूर्व) तसेच अंधेरी (पश्चिम) आणि दहिसर (पूर्व) स्थानकांदरम्यानही काही सेवा विस्तारित केल्या जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. रात्री उशिरा उत्सवात सहभागी होणारे नागरिक मेट्रो सेवेद्वारे व्यवस्थित घरी परतू शकतील यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

Web Title: Ganesh chaturthi central railway will run 22 special night suburban trains for ganpati festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा
1

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या
2

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या

7-8 मंडळांसह फेसबुक पेजवरून ‘मुंबईची नवरात्री’ संस्थेची सुरुवात, आज 300 पेक्षा जास्त मंडळाचा सहभाग
3

7-8 मंडळांसह फेसबुक पेजवरून ‘मुंबईची नवरात्री’ संस्थेची सुरुवात, आज 300 पेक्षा जास्त मंडळाचा सहभाग

दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा ‘या’ सुंदर डिझाईनची रांगोळी, घरातील सगळेच करतील कौतुक
4

दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा ‘या’ सुंदर डिझाईनची रांगोळी, घरातील सगळेच करतील कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.