Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! गॅस पुरवठा आता लवकरच सुरळीत होणार; नियमांत केला गेला ‘हा’ महत्त्वपूर्ण बदल

आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. याप्रकरणी व्यावसायिक गॅसच्या परवठयावर अंशतः निर्बंध लादण्यात आले आहेत. याचा हॉटेल व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 15, 2026 | 08:36 AM
गॅसपुरवठ्याच्या नियमांत पुन्हा बदल

गॅसपुरवठ्याच्या नियमांत पुन्हा बदल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : इराण युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे ग्राहकांच्या गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगा लागल्या आहेत. यामुळे सरकारने एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना गॅस पुरवठ्याचा प्राधान्यक्रम ठरवण्याचे दिशानिर्देश जारी केले आहेत. यात रुग्णालये, शैक्षणिक संस्थांसारख्या महत्त्वाच्या सेवांना १०० टक्के, तर काही क्षेत्रांना ५० ते ७० टक्के गॅस पुरवठा करण्याची सूचना देण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. याप्रकरणी व्यावसायिक गॅसच्या परवठयावर अंशतः निर्बंध लादण्यात आले आहेत. याचा हॉटेल व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे गॅस वितरणाविषयी एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना १०० टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर इतर संस्था व विभागांना ५० ते ७० टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

दरम्यान, राज्यात घरगुती एलपीजी गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम तसेच अफवा पसरल्या जात असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टच्या माध्यमातून केले आहे. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

कोणत्या क्षेत्राला किती मिळणार गॅस?

सरकारच्या निर्देशांनुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना १०० टक्के गॅस पुरवण्यात येईल. स्मशानभूमी, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांनाही १०० टक्के गॅस पुरवठा करण्यात येईल. तर उपहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस/तुरुंग यांना ७० टक्के गॅसचा पुरवठा केला जाईल. याशिवाय एसटी महामंडळ, औषध उद्योग, बीज प्रक्रिया व मत्स्यपालन क्षेत्राला ५० टक्के गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली आहे.

हेदेखील वाचा : Strait of Hormuz: भारतासाठी मोठी बातमी ! होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना ‘ग्रीन सिग्नल’; युद्धातही इराणने जपली मैत्री

Web Title: Gas supply to be restored soon significant change made to regulations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

PM Modi Live Today: आखाती देशांतील युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दुरगामी परिणाम…; नरेंद्र मोदी लोकसभेत काय म्हणाले?
1

PM Modi Live Today: आखाती देशांतील युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दुरगामी परिणाम…; नरेंद्र मोदी लोकसभेत काय म्हणाले?

LPG वजनात बदल: मासिक खर्चाचे गणित कोलमडणार? १० किलो गॅस सिलेंडरचे पूर्ण विश्लेषण
2

LPG वजनात बदल: मासिक खर्चाचे गणित कोलमडणार? १० किलो गॅस सिलेंडरचे पूर्ण विश्लेषण

Iran-Israel War: अवकाळी पावसाचा एसी विक्रीवर परिणाम; प्लास्टिक महागल्याने उपकरणांच्या किमती वाढणार
3

Iran-Israel War: अवकाळी पावसाचा एसी विक्रीवर परिणाम; प्लास्टिक महागल्याने उपकरणांच्या किमती वाढणार

Indian Stock Market: जागतिक तणावामुळे बाजारावर दबाव; परदेशी गुंतवणूकदारांची बाजारातून माघार 
4

Indian Stock Market: जागतिक तणावामुळे बाजारावर दबाव; परदेशी गुंतवणूकदारांची बाजारातून माघार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.