पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघेही नेते वेळोवेळी एकमेकांवर टीका करत आले आहेत. आता एका पत्रकाराच्या व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत खडसे यांनी महाजन यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी कथित संबंध असल्याचा दावा खडसे यांनी केला असून, या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
खडसे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये त्यांनी म्हटले, “गिरीश महाजन यांच्याविरोधात ‘गिरीश महाराजांच्या रंगल्या रात्री’ या शीर्षकाखाली एका पत्रकाराने एक क्लिप प्रकाशित केली आहे. त्या क्लिपमध्ये संबंधित पत्रकाराने असा दावा केला आहे की, महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी कथित संबंध आहेत. मला त्या अधिकाऱ्याचं नाव माहीत आहे, परंतु ते जाहीरपणे सांगणं योग्य ठरणार नाही.”
हमासचा इस्रायलच्या शहरांवर मोठा हल्ला; गाझातील हत्याकांडाच्या प्रत्युत्तरात हल्ले केल्याचा दावा
गिरीश महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा, या शिर्षकाखाली लिहीलेल्या लेखाबाबत बोलताना खडसे म्हणाले की, ‘एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत गिरीश महाजन यांचे संबंध आहेत. त्या महिलेचे नाव मला माहिती आहे. पण ते सांगणं योग्य राहणार नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गिरीश महाजनांना बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी. संबंधित महिला आयएएस अधिकाऱ्यांशी तुझे संबंध आहेत का, अशी विचारणाही केली. पण कामानिमित्त माझे अनेकांशी संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो. असं त्यांनी अमिता शाहांना सांगितलं.
त्यावर अमित शाहांनी तुझे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहे. रात्री एक वाजल्यापासू पुढील दिवसभरात तुझे शंभर शंभर कॉल झालेले आहेत. त्यामुळे तू आता काहीही सांगितल तरी तुझा सीडीआर खरं बोलतोय त्यामुळे रोज बोलण्याचं कारण काय आहे, असा प्रश्न अमित शाहांनी त्यांना विचारला होता. असा खुलासा या अहवालातून करण्यात आला आहे.
Chhatrapati Sugar Factory Election: ‘छत्रपती’ कारखान्याचा गड विरोधकांनी जिंकला; अजित पवारांनी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. खडसेंवर टीका करताना महाजन म्हणाले, “ते नेहमी कमरेखालून वार करतात. त्यांना दुसरं काही जमणारच नाही. त्यांची अवस्था काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी त्यांच्या पातळीवर जाऊ शकत नाही.”
महाजन पुढे म्हणाले, “मी जर बोलायला सुरुवात केली, तर लोक त्यांना घराबाहेर देखील पडू देणार नाहीत. ते एक नंबरचे महाचोर आहेत. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला, तर त्यांचं तोंड काळं होईल. काही गोष्टी घरातील आहेत, म्हणून मी शांत आहे. मला बोलायला भाग पाडू नका.”