मानकापूर परिसरात ढिगाऱ्याला आग; आग वेळीच आटोक्यात आणली म्हणून... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
जेरुसेलम: हमासच्या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या अनेक शहरावर मोठे हल्ले केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी (06 एप्रिल इस्रायलच्या दक्षिणेकडील शहरांना लक्ष्य करत रॉकेट हल्ले केल. पंरुत इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुार, त्यांना बरेच रॉकेट् आकाशातच नष्ट केले. हमासने हल्ल्यांचे स्पष्टीकरण देताना दावा केला आहे की, इस्रायलच्या सुरक्षा दलांनी गाझात केलेल्या हत्याकांडांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर हल्ले करण्यात आले आहेत.
इस्रायली संरक्षण दलसाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 10 क्षेपणास्त्रे हमाने त्यांच्या शहरावर डागली. मात्र इस्रायलला यापैकी अनेक क्षेपणास्त्रांना रोखण्यात यश आले. हमासच्या या हल्ल्यात 12 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिणेकडील इस्रायलच्या अश्ललोक शहरावर हमासने हल्ला केला.
This is just one neighborhood in Israel hit by Hamas rocket fire tonight.
Hamas continues to hide behind Gazan civilians while firing at Israeli civilians.
We will continue to defend Israelis from the threat of terrorism. pic.twitter.com/AO5psGRfRq
— Israel Defense Forces (@IDF) April 6, 2025
हल्ल्याची माहिती मिळताच इस्रायलचे आपत्कालीन पथक त्वरित घटनास्थळी दाखल झालेले. सध्या जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरु आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल लष्कराने एक आदेश जारी केला आहे. या आदेशात इस्रायलने गाझा पट्टीतील देईर अल-बलाह शहरातील रहिवाशांना क्षेत्र सोडून जाण्याचे आदेश दिले आहे. लष्कराने सतर्कतेत म्हटले आहे की, ‘हल्ल्यापूर्वी हा शेवटचा इशारा आहे’. त्यांनतर लगेचच इस्त्रायली लष्कराने गाझा पट्टीतून हल्ला करणाऱ्या हमासच्या गटावर रॉकेट हल्ले केले. दरम्यान इस्रायलच्या या हल्ल्यात 39 जणांचा मृत्यू झाला असल्याचे गाझातील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान नेतन्याहूंना हमासवरील हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी हमासला कडक प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. नेतन्याहूंनी सैन्याला हमासविरुद्ध तीव्र कारवाई करण्यास मान्यता दिली आहे.
इस्रायल-हमास युद्ध गेल्या 15 महिन्यांपासून सुरु आहे. 19 जानेवारी रोजी इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली होती. याअंतर्गत युद्धबंधीच्या पहिल्या टप्प्यात इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात आली आणि काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास हमासने नकार दिल्याने १९ मार्च रोजी इस्रायलने मध्य आणि दक्षिण गाझात हल्ले सुरु केले. गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये ५०,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेल्याचे पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.