Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जुन्या ठाणेकरांना तातडीने घरगुती गॅस जोडणी द्या” खासदार नरेश म्हस्के यांची महानगर गॅसला तंबी

खासदार नरेश म्हस्के यांनी महानगर गॅसला तंबी दिली आहे. त्यांनी जुन्या ठाणेकरांना तातडीने घरगुती गॅस जोडणी देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 26, 2025 | 08:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे शहरातील नौपाडा, राम मारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही पाईप लाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी झालेली नाही. जुने ठाणे अद्याप घरगुती गॅस जोडणी पासून वंचित आहे. आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तसेच या रहिवाशांना तातडीने पाईप लाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करावी अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

पंढरपूरला प्रतिक्षा वारकऱ्यांची अन् पालखीची; सुविधांची पाहणीसाठी पालकमंत्र्यांची टीम ग्राऊंडवर…!

जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) या कंपनीकडे या संदर्भात मागणी करण्यात आली, अर्ज दिले, बैठकाही घेण्यात आल्या, परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या भागातील नागरिकांना घरगुती गॅस ऐवजी सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नाकती, प्रकाश पायरे, बाळा गवस, संजीव कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी आज एक विशेष बैठक आयोजित केली. ही बैठक आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत महानगर गॅसचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि विविध गृहसंकुलांचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या तक्रारी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या. काही ठिकाणी गॅस लाईनच पोहोचलेली नाही, तर काही ठिकाणी कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत, काही सोसायट्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील जोडणी झालेली नाही, अशा रहिवाशांनी तक्रारी केल्या. या बैठकीत शिवसेनेचे किरण नाकती आणि प्रकाश पायरे यांनी अनेक सोसायटी संदर्भात समस्या मांडल्या आणि महानगर गॅस प्रशासनासमोरील अडचणी समजावून सांगितल्या.

विधानसभा निवडणुकीसंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकाश आंबेडकरांनी घेतला ‘हा’ निर्णय

महानगर गॅस ही एकमेव सेवा पुरवठादार कंपनी असल्यामुळे नागरिकांना दुसऱ्या कोणत्याही पर्यायाकडे जाता येत नाही. म्हणूनच या कंपनीने जबाबदारीने काम करणे अत्यावश्यक आहे. तुम्ही सरकारी मान्यतेने सेवा देत आहात, पण नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना दिली.

महानगर गॅस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोठेगावकर यांनी तात्काळ गॅस जोडणी पूर्ण करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विलास जोशी, भास्कर पाटील, प्रीतम रजपूत, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Web Title: Give domestic gas connections to old thanekars immediately mp naresh mhaske urges mahanagar gas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • Naresh Mhaske
  • Thane news

संबंधित बातम्या

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
1

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत
2

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत

जागतिक हृदयदिन विशेष, एक पाऊल आरोग्याकडे; फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात हृदयविकारावरील उपचारातील महत्त्वपूर्ण सादरीकरण
3

जागतिक हृदयदिन विशेष, एक पाऊल आरोग्याकडे; फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात हृदयविकारावरील उपचारातील महत्त्वपूर्ण सादरीकरण

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात
4

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.