प्रकाश आंबेडकर सुप्रीम कोर्टात जाणार (फोटो -सोशल मीडिया)
मुंबई: मागील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले. तर महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव झाला. मात्र या निकालानंतर महाविकास आघाडी आणि अन्य विरोधी पक्षांनी मतदानाची आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हायकोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. तर ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले.
मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले, या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असून जे तथ्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयासमोर मांडले होते ते सर्वोच्च न्यायालयासमोर मांडणार आहोत. आम्ही दाखल केलेली याचिका ही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, नियमबद्ध आणि कायद्यानुसार झाली की नाही, याच्या तपासणीसाठी होती.”
पुढे बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, “निवडणूक आयोगाने २०-११-२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या प्रेसनोटमध्ये मतदानाची टक्केवारी 6.80% वाढली असल्याचे नमूद आहे, ज्यामध्ये तब्बल 76 लाख मतांची भर पडली होती. जर ही आकडेवारी आयोग मान्य करत असेल, तर त्या अनुषंगाने नोंदी आहेत क?, हे आम्ही विचारले होते. पण, त्या नोंदी कोर्टात सादर केल्या गेल्या नाहीत. अशा परिस्थितीत ही निवडणूक खरोखर मुक्त आणि पारदर्शक होती का? याची तपासणी व्हायलाच हवी होती,” असा ठाम आग्रह त्यांनी व्यक्त केला.
‘आमचा कामकाजाचा वेळ वाया…’; विधानसभेच्या ‘या’ प्रकरणात प्रकाश आंबेडकरांना हायकोर्टाचा दणका
पुढे म्हणाले, “आम्ही जी याचिका दाखल केली होती, ती निवडणूक याचिका नव्हती, तर निवडणूक कंडक्टवरील रीट पिटीशन होती. मात्र, कोर्टाने तिचा निवडणूक याचिका असा अर्थ लावून ती निवडणूक याचिका असल्याचे समजले आणि त्याच आधारावर निकाल दिला. हा लोकशाहीला धक्का आहे.”
‘आमचा कामकाजाचा वेळ वाया…’; विधानसभेच्या ‘या’ प्रकरणात प्रकाश आंबेडकरांना हायकोर्टाचा दणका
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 76 लाख मतदारांचा वाढलेला आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे.
प्रकाश आंबेडकर यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याचिका ऐकून कालचा आमचा कामकाजाचा वेळ वाया गेला, असे निरीक्षण हायकोर्टाने याचिका फेटाळताना नोंदवले आहे.