mira bhayander goat controversy
मिरा भाईंदर: मिरा भाईंदरच्या (Mira Bhayandar) एका उच्चभ्रूंच्या बिल्डिंगमध्ये मंगळवारी रात्री फ्लॅटमध्ये बकरे आणण्यावरुन वाद झाला. (Bakri Eid) सुमारे अडीच हजार जणांचा जमाव या कृत्याला विरोध करण्यासाठी बिल्डिंगखाली जमा झाल्याचं या पीडित मुस्लीम कुटुंबातील महिलेनं सांगितलं आहे. रात्री नेमंक काय घडलं हे त्यांनी सांगितलंय. (Goat Controversy)
‘कुणी माझ्या पतीचा गळा पकडला होता, तर दुसरं कुणीतरी काहीतरी करत होतं. माझा 4 वर्षांचा मुलगा इतका घाबरला की त्यानं चड्डीतच संडास केली. तो लहानगा भीतीनं थरथर कापत होता. यांचे जेव्हा सण-उत्सव असतात तेव्हा रात्री 11 वाजेपर्यंत डीजे वाजत असतात. यावर आम्ही कधी आक्षेप घेतलेला नाही. ज्या लोकांच्या घरी आम्ही दिवाळी, नवरात्र आणि गणपतीत मिठाई घेऊन जातो ती मंडळीही या गर्दीत होती. यामुळं आम्हाला प्रचंड दु:ख झालं. तो अडीच हजारांचा जमाव आमचं मॉब लिंचिंग करु शकत होता’, हे वास्तव या मुस्लीम महिलेनं सांगितलंय.
बीती रात मीरा रोड के जेपी इन्फ्रा सोसाइटी में 2 बकरे लाये जाने पर मचा विवाद।सोसाइटी के नोटिस बोर्ड पर सोसाइटी के अंदर बकरे न काटे जाने का लगा था नोटिस।मौके पर लोग जमा हुई पोलिस।दोनों पक्षो को समझाकर पोलिस ने मामले को कराया शांत। एक पक्ष का कहना है कि पॉश सोसाइटी में 2 बकरे इसलिए… pic.twitter.com/sqePxyNKoD — Jayprrakash Singh (@jayprakashindia) June 28, 2023
पीडित मोहसिन खान यांनी सांगितलं की, एक व्यक्ती माझ्याशी येऊन वाद घालत होती. मी त्याला विचारलं की तुम्ही कोण आहात. त्या माणसाला यापूर्वी मी कधीही आमच्या बिल्डिंगमध्ये पाहिलं नव्हतं. ‘मी त्याला सांगितलं की मला नियम दाखव की ज्यात मी बकरी आणू शकत नाही, असं लिहिलंय.’
मॉब लिंचिंग घडण्याची होती भीती
फ्लॅटमध्ये बकऱ्या आणल्या म्हणून मुस्लीम दाम्पत्याला विरोध करण्यासाठी अडीच हजार जणांचा जमाव या बिल्डिंगच्या खाली जमा झाला होता. यात मॉब लिंचिंग घडू शकलं असतं, अशी भीती मोहसिन खान यांनी व्यक्त केलीय. बकऱ्यांना सोसायटीत आणणं हे जर कायद्याच्या विरोधात होतं, तर त्याची तक्रार पोलिसांत करण्याची गरज होती. त्याऐवजी मोठी गर्दी आम्हाला विरोध करण्यासाठी एकत्र आली. या गर्दीनं मारहाण केली, छेडछाड केली आणि मानसिक त्रास दिल्याचं मोहसिन यांनी सांगितलंय.
जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप
यास्मीन यांनी सांगितलं की, ते गेल्या 3 वर्षांपासून या सोसायटीत राहतायेत. बकऱ्याचा बळी बिल्डिंगच्या बाहेर देणार असल्याचं आम्ही सांगत होतो, मात्र आमचं कुणीही ऐकून घेतलं नाही. आम्ही फक्त आमच्या घरात बकऱ्या आणल्या होत्या. ते आमचं घर आहे, आम्ही त्याचे मालक आहोत. आम्ही कुणाच्याही भावना दुखावल्या नव्हत्या. दुपारच्यावेळी जेव्हा बकऱ्या आमल्या त्यावेळी कुणीही बाहेर नव्हतं. जाणीवपूर्वक आम्ही बकऱ्या आणण्याचं सीसीटीव्ही फूटेज काढून ते व्हायरल करण्यात आलं. जाणीवपूर्वक हा मुद्दा सांप्रदायिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कितीही हनुमान चाळीसा म्हणाल, आम्हाला काहीही अडचण नाही
तुम्ही हनुमान चाळिसा म्हणा, जय श्रीरामची घोषणाबाजी करा. भजन करा, याचा आम्हाला कसलाही त्रास होत नाही. मात्र आमचा आदर करा. जर आम्ही तुम्हाला त्रास देत नाही तर तुम्ही आम्हाला टॉर्चर का करताय? असा सवाल या कुटुंबानं विचारलाय.