Local Body Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या.निवडणूका ऐन उंबऱ्यावर येऊन ठेपल्या असताना मतदार यादीत सावळा गोंधळ झाल्याचं समोर आलं.
भाईंदर (प.) येथील मौजे मिरे परिसरात वादग्रस्त जमिनीवर अवैध कब्जा करण्याच्या प्रयत्नाने खळबळ उडाली. काशीमीरा पोलिसांनी ३० जणांना अटक केली असून, त्यापैकी १८ आरोपींना न्यायिक कोठडीत पाठवले आहे.
मिरा भाईंदर मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर. एकूण ९५ पैकी महिलांसाठी ४८, OBC साठी २५ जागा राखीव. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीवर १७ नोव्हेंबरपर्यंत हरकती/सूचना सादर करता येतील.
4 वर्षांपासून सुरू असलेल्या नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला यश मिळाले आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अखेर उत्तन-डोंगरी येथील मेट्रो-9 च्या डिपो योजनेला रद्दबातत ठरवले आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी २४ सप्टेंबर रोजी उत्तन, पाली, चौक, तारोडी आणि डोंगरी या पाच गावांचा प्रारूप विकास आराखडा (Draft Development Plan) जाहीर केला.
भाईंदरमधील राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपाचे वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नगरसेवक संजय थेराडे यांच्यावर “वोट चोरी”चे गंभीर आरोप करण्यात आले होते.
दोन तरुणांनी एकत्र केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केल्याुमुळे ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर अखेर सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर आयुक्तांचा फोटो शेअर करत त्यांना “शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा” दिल्या. या पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून उत्तन परिसराचा सुधारित प्रारूप विकास आराखडा अखेर प्रसिद्ध करण्यात आला आहे. महापालिकेकडून नागरिकांना या आराखड्यावरील हरकती (आक्षेप) व सूचना नोंदवण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आली असली तरी या निर्णयावरून आता राज्याच्या राजकारणात प्रचंड गोंधळ माजला आहे.
काशिमिरा परिसरात काल एका ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आरएमसी प्लांटच्या डंपरखाली चिरडून मुलाचा जीव गेल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेनंतर स्थानिकांनी आंदोलन केलं आहे.
काशिमिरा परिसरात आज दुपारच्या सुमारास एका रेडीमिक्सच्या डंपरने एका अकरा वर्षांच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. यावर संतप्त मनसैनिकांनी शहरात रास्ता रोको आंदोलन केलं आहे.
मीरा-भाईंदर-वसई विरार गुन्हे शाखा (कक्ष-4) यांनी तेलंगणातील चेरापल्ली परिसरात एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ बनविणारा कारखाना उद्ध्वस्त करून मोठा गुन्हेगारी पर्दाफाश केला आहे.