Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग; केबिनने अचानक घेतला पेट अन् क्षणात…

आग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे लक्षात येताच साई राजअर्थ मूव्हर्स व वॉटर सप्लायरचा पाण्याचा टँकरही तातडीने घटनास्थळी दाखल झाला. टँकरच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2026 | 03:18 PM
पुण्याहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग; परिसरात एकच खळबळ

पुण्याहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग; परिसरात एकच खळबळ

Follow Us
Follow Us:

उंब्रज : पुण्याहून कराडच्या दिशेने बंगळूर-मुंबई महामार्गावरून जाणाऱ्या मालट्रकच्या (MH 04 LQ 6816) केबिनने अचानक पेट घेतला. त्यामुळे उंब्रज परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ट्रकच्या केबिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच कराड अर्बन बँकेच्या उंब्रज शाखेतील प्रशासन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचे फायर सिलिंडर वापरून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच पाण्याचा पुरवठा सुरू करून आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत केली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

Virar Illegal Construction Scam : बनावट परवानग्यांवर अनधिकृत इमारतींचा गोरखधंदा; महारेरा नोंदणीशिवाय सदनिकांची विक्री, दस्तनोंदणी !

दरम्यान, आग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे लक्षात येताच साई राजअर्थ मूव्हर्स व वॉटर सप्लायरचा पाण्याचा टँकरही तातडीने घटनास्थळी दाखल झाला. टँकरच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. स्थानिक युवक व नागरिकांनीही धाडसाने पुढे येत मदतकार्य केले. या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ

महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने आग विझवताना तसेच वाहतूक सुरळीत ठेवताना प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र नागरिक, युवक, कराड अर्बन बँकेचे अधिकारी-कर्मचारी, पाण्याचा टँकर चालक आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

मालट्रकची केबिन जळून खाक

आगीच्या तीव्रतेमुळे मालट्रकची केबिन मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचे नेमके कारण आणि ट्रकमधील मालाचे झालेले नुकसान याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि विविध घटकांनी केलेले तातडीचे मदतकार्य यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

Vasai Ganeshotsav News : विसर्जन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; किनाऱ्यावर गणेशमूर्तींची विटंबना, पालिका- पोलिसांची धावपळ

Web Title: Goods truck heading from pune towards karad catches fire suddenly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Karad news
  • Truck

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.