मुंबई – भारताल ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती आहे. याची दखल घेते गुगलने खाशाब जाधव यांचं डुडल तयार केलं आहे. या पार्श्वश्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याशिवाय, अद्यापर्यंत खाशाबा जाधव यांचा कामगिरीचा सरकारकडून उचित सन्मान करण्यात आला नसल्याचे म्हणत नाराजीही व्यक्त केली आहे.
गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही !
१९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे ! pic.twitter.com/PW3dVXPA1Y— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 15, 2023
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, “गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही!, १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे.”
याचबरोबर, “देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून “पद्म” पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत.” असंही त्यांनी निदर्शनास आणलं.