मुंबई: ज्येष्ठ अभिनेेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor bhagatsingh Koshyari) यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
[read_also content=”‘गोदावरी’ ठरला विक्रम गोखलेंचा अखेरचा सिनेमा, साकारलेली जितेंद्र जोशीच्या आजोबांची भूमिका https://www.navarashtra.com/movies/godavari-was-the-last-cinema-in-which-vikram-gokhale-done-role-of-jitendra-joshis-grandfather-nrsr-348536.html”]
रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचा मापदंड प्रस्थापित केला. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवर देखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. अलीकडेच दिनांक १५ ऑगस्ट रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली होती. ही त्यांनी काम केलेली अखेरची मालिका होती.