(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणो अनोखे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अशातच एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांनाच अचंबित करून सोडलं आहे. व्हिडिओमध्ये तरुणाने असा पराक्रम करून दाखवला आहे की ते पाहून सर्वांचेच डोळे विस्फारून गेले आहेत. व्हिडिओमध्ये तरुणाच्या प्रतापामुळे रस्त्यावर लोकांचा जमाव जमा झाल्याचेही दिसून आले. चला व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
काही लोक ड्रामेबाज असतात ओ… पण इतका ड्रामा तुम्ही आजवर कुठे पाहिला नसेल जितका या व्हिडिओत तुम्हाला दिसून येईल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, रस्त्यावर एक बस थांबलेली दिसते. तिथे पोलिसांचे वाहन आणि काही इतर अनेक वाहनेही थांबल्याचे दिसते. एका मागून एक अनेक लोक यावेळी थांबून अवकाशात काही तरी बघत असतात आणि जेव्हा कॅमेरा त्या दिशेने वळवला जातो तेव्हा ते दृश्य पाहून सर्वच अवाक् होतात. वास्तविक, एक माणूस विजेच्या खांबाच्या अक्षरशः टोकावर चढून उभा असल्याचे यात दिसून येते. तो वर चढला आहे आणि अगदी काठावर उभा राहिला. हे दृश्य इतके अजब आणि धडकी भरवणारे होते की जो तो रस्त्यावर स्तब्ध होऊनच हे दृश्य पाहत होता. आता हा माणूस त्या खांबावर का आणि कसा चढला हे तर काही समजलं नाही पण त्याची ही कृती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @brainsco नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘भावाचा नेटवर्क नाही आला’ असे व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रेमाचं चक्कर आहे, त्याला त्याच्या बाबूसोबत बोलायचं असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “उंच लोकांची उंच आवड” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येकाकडे असे धाडस नसते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.