गौरीगणपतीच्या सणाला ग्लोईंग आणि चमकदार त्वचेसाठी १५ मिनिटांमध्ये घरीच करा फेस स्क्रब
देशभरात सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची मोठ्या जलौषात तयारी केली जात आहे. गणपतीच्या बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. पण धावपळीची जीवनशैली, सतत काम आणि इतर अनेक गोष्टींमुळे महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यास जास्तीचा वेळ मिळत नाही. याशिवाय महिला त्वचेच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाही. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, फोड आणि मुरुमाचे डाग त्वचा अतिशय निस्तेज करून टाकतात. याशिवाय त्वचेची गुणवत्ता काहीशी खराब सुद्धा होऊन जाते. अशावेळी त्वचा सुधारण्यासाठी महागडे स्किन केअर प्रॉडक्ट, क्रीम किंवा इतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी चेहऱ्यावर लावल्या जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सणावाराच्या दिवसांमध्ये त्वचा आणखीनच सुंदर आणि उजळदार करण्यासाठी घरच्या घरी फेस स्क्रब करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक ग्लो वाढण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
पावसात उवांनी भरलेलं डोकं सारखं खाजवतय? मग चिंता सोडा, आजच ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा
सुंदर त्वचेसाठी सतत महिला बाजारातील महागड्या स्किन केअरचा वापर करतात. मात्र असे न करता त्वचेला सूट होणाऱ्या घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचा लाल होणे, चेहऱ्यावर मुरूम येणे इत्यादी कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना तुम्ही मुलतानी माती आणि टोमॅटोचा वापर करू शकता. टोमॅटो त्वचेमधील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते. याशिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढते.
फेस स्क्रब करण्यासाठी टोमॅटोचे मधोमध दोन तुकडे करून घ्या. त्यानंतर त्यावर मुलतानी माती टाकून पसरवून घ्या. टोमॅटोने हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करून घ्या. त्यानंतर ५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ करा. हा उपाय दोन किंवा तीन दिवस नियमित केल्यास त्वचेमधील घाण स्वच्छ होईल आणि चेहरा उजळदार दिसेल. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी टोमॅटोचा वापर अतिशय प्रभावी ठरेल. टोमॅटोमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. नैसर्गिकरित्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी टोमॅटोचा वापर नियमित करावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार दिसेल. चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी टोमॅटो आणि मुलतानी मातीचा फेसपॅक बनवून सुद्धा लावू शकता.
त्वचेची काळजी कशी घ्यावी?
तुमचा चेहरा दिवसातून दोनदा स्वच्छ धुवा. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सनस्क्रीनचा वापर करा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्वचेला स्क्रब करा.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
उन्हामुळे होणाऱ्या सनबर्नपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा. त्वचेला खाज सुटणे, चिकटपणा येणे किंवा पुरळ येणे यांसारख्या समस्या टाळण्यासाठी त्वचेची खास काळजी घ्या.
त्वचेसाठी कोणती उत्पादने वापरू नयेत?
त्वचेला हानिकारक असलेल्या ब्युटी उत्पादनांचा वापर टाळा.