आज आधुनिक युगात कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वात जास्त सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात आजही हिंदू संस्कृतीनुसार पारंपारिक शेतीला महत्त्व दिले जाते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पालखीचे सारथ्य करणाऱ्या बैल जोड्यांचे आगमन डागवले कुटुंबामध्ये झाले. आज पोळा सणानिमित्त या दोन्हीही बैलांना आकर्षक सजवून त्यांची परिसरामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कुटुंबातील महिलांनी तसेच शेतकरी बांधवांनी सर्व बैलांची मनोभावे पूजा करुन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सारथ्य करणाऱ्या बैलजोडीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.