स्मार्टफोन युजर्सच्या डोक्याला झालाय ताप! अचानक बदलली फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग, काय आहे या बदलाचं कारण?
तुम्ही देखील अँड्रॉईड स्मार्टफोन युजर आहात का? मग तुम्ही देखील गेल्या दोन दिवसांपासून नक्कीच वैतागला असेल. याचं कारण म्हणजे कॉल आणि डायलर सेटिंगमध्ये झालेला बदल. कोणत्याही अपडेटशिवाय कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलली आहे. विवो, रेडमी, वनप्लस, पोको अशा अनेक स्मार्टफोन्समध्ये हा नवीन बदल पाहायला मिळत आहे. या नवीन बदलांमुळे अनेक स्मार्टफोन युजर्स वैतागले आहेत. या बदलाबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट वायरल होत आहेत. सोशल मीडियावर या बदलाचे कारण विचारले जात आहे. मात्र अनेकांना बदलाबाबत माहिती नाही. फोनमध्ये झालेल्या बदलामुळे युजर्सच्या डोक्याला ताप झाला आहे. हा बदल का झाला आणि याचं कारण काय, तुम्ही तुमची स्मार्टफोन सेटिंग पहिल्यासारखी कशी करू शकता, याबाबत आता जाणून घेऊया.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉल आणि डायलर सेटिंगमधील हा बदल केवळ अशाच स्मार्टफोनमध्ये झाला आहे, ज्यामध्ये Google Phone App डायलर अॅप म्हणून सेट करण्यात आला आहे. Google ने त्यांच्या Phone अॅपमध्ये Material 3 Expressive रीडिझाइन लागू केले आहे, जे आता युजर्सपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. हे नवीन डिझाइन विशेषतः अधिक आधुनिक, सोपे आणि यूजर-फ्रेंडली बनवण्यासाठी डिझाइन केले आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल अॅपच्या नेव्हिगेशन स्टाइलमध्ये दिसून येतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
नव्या बदलांनतर आता अॅपमध्ये तीन टॅब आहेत. जिथे Favorites आणि Recents ला मिळून Home टॅब बनवण्यात आला आहे. या होम टॅबमध्ये तुमची कॉल हिस्ट्री दिसणार आहे आणि वरच्या बाजूला एक बार/कॅरोसेलमध्ये तुमचे फेवरेट कॉन्टॅक्ट्स दिसणार आहेत. यामुळे वारंवार कॉन्टॅक्ट्स सर्च करण्याची गरज लागणार नाही आणि तुमचे महत्त्वाचे संभाषणे लवकर ऐकता येतात.
Keypad सेक्शनमध्ये देखील नवीन डिझाईन देण्यात आली आहे. पहिले हे फ्लोटिंग ॲक्शन बटणद्वारे सुरु व्हायचं, मात्र आता हे अॅप वेगळ्या टॅबद्वारे तयार करण्यात आले आहे. नंबर पॅड आता गोलाकार कडा असलेल्या डिझाइनमध्ये दिसतो, ज्यामुळे इंटरफेस अधिक स्वच्छ दिसतो. त्याच वेळी, व्हॉइसमेल विभागात कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत, फक्त त्याच्या लिस्ट स्टाइलला एक नवीन लूक देण्यात आले आहे.
HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
गुगलने नवीन नेव्हिगेशन ड्रॉवरमध्ये संपर्क विभाग सादर केला आहे. अॅपच्या सर्च फील्डमधून ते अॅक्सेस करता येते. या ड्रॉवरमध्ये कॉन्टॅक्ट्स व्यतिरिक्त, सेटिंग्ज, क्लियर कॉल हिस्ट्री आणि मदत आणि फीडबॅक पर्याय दिले आहेत. यासोबतच इनकमिंग कॉल स्क्रीनला देखील नवीन लूक देण्यात आले आहे. आता रिसिव्ह किंवा रिजेक्ट करण्यासाठी तुम्हाला हॉरिजॉन्टल स्वाइप किंवा सिंगल टॅपचा ऑप्शन मिळणार आहे. यामुळे तुम्ही सेटिंग्ज > इनकमिंग कॉल जेश्चर सेट करू शकता.
In-call इंटरफेसमध्ये देखील बदल झाला आहे. आता कॉलदरम्यान वापरले जाणारे बटन पिल-शेपमध्ये दिसते. जेव्हा तुम्ही त्यांना निवडता तेव्हा ते राउंडेड रेक्टेंगलमध्ये बदलतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एंड कॉल बटण पूर्वीपेक्षा मोठे केले गेले आहे.
जर तुम्हाला हे फीचर आवडत नसेल तर तुम्ही ते बदलू शकता. यासाठी तुम्हाला कॉल अॅपची सेटिंग ओपन करून सर्वात आधी क्लिअर कॅशेवर टॅप करावे लागणार आहे. यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा आणि अनइंस्टॉल अपडेटवर क्लिक करा. यानंतर तुमची कॉल आणि डायलर सेटिंग पूर्वीसारखी होणार आहे.