५ दिवसात होणार लाखाच्या वर पूजापाठ
जी.एस.बी. सेवा मंडळ हे अखंड अध्यात्म, धार्मिक निष्ठा आणि पवित्र पूजाविधींसाठी विशेष प्रसिद्ध असल्याचे संबोधले जाते.ज्यामुळे देशभरातील भाविक या पवित्र धार्मिक सेवेसाठी पाच दिवस आवर्जून हजेरी लावतात. यावर्षी या बाप्पाचा तब्बत ७०३ कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे. केवळ ५ दिवस या बाप्पाचं दर्शन घेता येतं आणि इथे भाविकांची अक्षरशः रांग लागलेली दिसून येते. हा बाप्पा नवसाला पावतो अशी त्याच्या आख्यायिका सांगितली जाते आणि त्यामुळेच इथे खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. नवस पूर्ण झालेले भक्त इथे आपल्या वजनाइतक्या गोष्टी दानही करतात.
पाच पवित्र दिवसात विविध धार्मिक पूजा आणि अन्नदान सेवा होणार असून या पावन दिवसांत पारंपरिक वैदिक पुरोहितांच्या हस्ते १,००,००० हून अधिक पूजा व सेवा संपन्न होणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
Mumbaicha Raja First Look: कमळावर उभा, अष्टभुजा अवतारी; मुंबईच्या राजाचा पहिला लुक
जीएसबी मंडळाकडून गणेशोत्सवामध्ये डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून, पारंपरिक आणि छापील पावत्यांची पद्धत बंद केली आहे. यामुळे कागदाचा अपव्यय टाळला जातो आणि पर्यावरणपूरक उत्सवाला चालना मिळते. या गणेशोत्सवात मंडळाकडून ‘गो ग्रीन’ (पर्यावरणपूरक) उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच महागणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक असून, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने मंडळाकडून पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.






