Mumbaicha Raja First Look: मुंबईचा राजा हा लालबागमधील गणेशगल्लीमध्ये स्थापित होतो आणि लालबागच्या राजाप्रमाणेच याचा लाखो करोडो भक्त आहेत. मुंबईतील गणेशोत्सवात याला मानाचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. आज या राजाचा पहिला लुक समोर आला असून या मूर्तीने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहेत. कसा आहे मुंबईच्या राजाचा हा फर्स्ट लुक पहा झलक (फोटो सौजन्य - श्रद्धा पोटफोडे)
गणेशगल्लीच्या बाप्पाचं म्हणजेच मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज घडलं आहे. भाविकांची श्रद्धा या बाप्पासाठी खूपच मोठ्या प्रमाणात आहे

दरवर्षी भव्य देखावे आणि मंदिरांच्या प्रतिकृतीसाठी हा बाप्पा ओळखला जातो. या वर्षी हा बाप्पा अष्टभुजा स्वरूपात दिसतोय

गणेशगल्लीच्या बाप्पाचे सुंदर डोळे आणि त्याचे हे रुपच भक्तांसाठी खास आकर्षण आहे. पहिल्या लुकमध्येच या बाप्पांने सर्वांचं मन जिंकून घेतलंय

हातावर असलेल्या कमळात एका पायावर हा अष्टभुजा गणपती उभा आहे आणि ही मनमोहक मूर्ती मनाला एक वेगळीच शांतात देते आहे

बालगणेशाचे हे रूप मनात घर करून जातंय आणि आपोआपच तोंडातून बाप्पाचा जयजयकार होतोय

मुंबईचा राजाची ही भव्य, उंच आणि आकर्षक मूर्ती नेहमीप्रमाणेच सर्व भाविकांसाठी श्रद्धेच्या केंद्रासह दर्शनाचे केंद्रही ठरेल यात काहीच शंका नाही






