Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haffkine Institute Scam: हाफकिन महामंडळात कोट्यवधींचा महाघोटाळा: जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

Haffkine Scam : पोलिओ लसीच्या वाहतुकीसाठी विमानाऐवजी रस्तेमार्गाचा वापर करूनही ५० लाख रुपयांची विमान वाहतुकीची बनावट बिले सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भारत-आसियान मुक्त व्यापार करार अस्तित्वात असतानाही चुकीची माहिती दिल्यामुळे महामंडळाला ६१ कोटी रुपयांची सीमाशुल्क नोटीस आल्याचे त्यांनी सांगितले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 10, 2026 | 10:00 AM
Haffkine Institute Scam: हाफकिन महामंडळात कोट्यवधींचा महाघोटाळा: जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप
Follow Us
Follow Us:
  • हाफकिनमधील या गंभीर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील मनमानी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी (High-Level Inquiry) करून दोषी
  • सरकारने या संपूर्ण प्रकरणावर आतापर्यंत काय कारवाई केली, याचा सविस्तर अहवाल चालू विधीमंडळ सभागृहात सादर करावा
  • ‘कॅग’ (CAG) च्या लेखापरीक्षण अहवालातील ताशेरे वाचून दाखवत हाफकिनमध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप केला.
 

Haffkine Institute Scam: आर्थिक हाफकिन महामंडळातील गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील मनमानी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत तसेच सरकारने केलेल्या कारवाईचा अहवाल सभागृहात सादर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या लेखापरीक्षण अहवालातील निरीक्षणांचा दाखला देत हाफकिनमध्ये जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी झाल्याचा आरोप केला.

विमान वाहतुकीची बनावट बिले सादर

पोलिओ लसीच्या वाहतुकीसाठी विमानाऐवजी रस्तेमार्गाचा वापर करूनही ५० लाख रुपयांची विमान वाहतुकीची बनावट बिले सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भारत-आसियान मुक्त व्यापार करार अस्तित्वात असतानाही चुकीची माहिती दिल्यामुळे महामंडळाला ६१ कोटी रुपयांची सीमाशुल्क नोटीस आल्याचे त्यांनी सांगितले.

Slum Rehabilitation: झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा! फडणवीसांकडून नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी

लंडनमधील बँक खात्यात १५ लाख रुपये वळवणे, पोलिओ लस खरेदीतील कथित ५० कोटी रुपयांचा घोटाळा, जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने युनिसेफचे ३१५ कोटी रुपयांचे कंत्राट गमावणे, यंत्रसामग्री खरेदीत १.५ कोटी रुपयांचा आगाऊ निधी बुडणे आणि जादा वेतन व कायदेशीर खर्चातील अनियमिततेचाही त्यांनी उल्लेख केला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) २०२१ मध्ये पोलिओ लस उत्पादनासाठी आवश्यक असलेली दोन यंत्रे बदलण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या WHOच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याने २०२४ मध्ये WHO ने ऑर्डर देणे बंद केले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

त्यानंतर २०२५ मध्ये दोन यंत्रांऐवजी चार यंत्रे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यातही अवघ्या चार महिन्यांत पूर्ण होणारे काम तब्बल ११ महिने रखडले गेले. परिणामी, युनिसेफ (UNICEF) मार्फत मिळणारे सुमारे ३१५ कोटी रुपयांचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. मग हा उशीर कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आला का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

यावेळी ४.५ कोटी रुपयांच्या यंत्रखरेदी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “बंदी असलेल्या चीनमधून यंत्रे खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नंतर ही ऑर्डर रद्द करण्यात आली; मात्र त्यासाठी दिलेला १.५ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स निधी बुडाला.

याशिवाय, २००९ ते २०२० या कालावधीत कार्यरत असलेल्या एका महाव्यवस्थापकाने ५० लाख रुपये जादा वेतन घेतल्याचा प्रकार २०२४ च्या ऑडिट इन्स्पेक्शन अहवालातून उघड झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, एका महिला अधिकाऱ्याने दाखल केलेल्या शोषणाच्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याची बाजू मांडण्यासाठी महामंडळाच्या तिजोरीतून १२ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

महामंडळातील महत्त्वाची पदे जाणीवपूर्वक दीर्घकाळ रिक्त ठेवून नियमबाह्य पद्धतीने मर्जीतील सल्लागारांची नियुक्ती केली जात असल्याचा आरोप करत जयंत पाटील म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून महाव्यवस्थापकाचे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. पात्र आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून अनुभव नसलेल्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. घोटाळ्यांवर पडदा टाकण्यासाठीच हा प्रकार केला जात आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली

 

Web Title: Haffkine institute scam haffkine corporation scam cag report jayant patil demands probe polio vaccine fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 10:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.