Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया

चाकूरकर यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील अनुभवी, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची भावना सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2025 | 12:14 PM
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन
  • हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केल्या भावना
  • चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय
मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं आहे. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले. चाकूरकर यांच्या निधनानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकूरकर यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील अनुभवी, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची भावना सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

 

आपल्या शोकसंदेशात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विज्ञान शाखेत पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष म्हणून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. त्यानंतर लातूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९८० साली लातूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या पाटील चाकूरकर यांनी सलग सात निवडणुकांत मतदारांचा विश्वास संपादन केला.

इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रालयासह विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत दक्षता, शिस्त आणि प्रामाणिकपणाने सांभाळल्या. पुढे लोकसभा अध्यक्ष आणि पंजाबचे राज्यपाल म्हणून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात मोलाचे योगदान दिले. पाच दशकांहून अधिक काळाच्या आपल्या सार्वजनिक जीवनात लातूरसह महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदीय कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नव्या संसद ग्रंथालय इमारतीला गती देणे, अशा अनेक उपक्रमांत त्यांच्या दूरदृष्टीचा आणि प्रशासन कौशल्याचा प्रत्यय आला.

दांडगा जनसंपर्क, साधेपणा, शिस्त, तत्त्वनिष्ठा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाने लातूरची व काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सामील असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal has reacted after the death of shivraj patil chakurkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया
1

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

भाजपचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन
2

भाजपचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन

जावळीत सभापतिपदाच्या खुर्चीसाठी ‘ओढाताण’ सुरूच; मतदारांनी नेत्यांच्या डोळ्यात घातले ‘अंजन’
3

जावळीत सभापतिपदाच्या खुर्चीसाठी ‘ओढाताण’ सुरूच; मतदारांनी नेत्यांच्या डोळ्यात घातले ‘अंजन’

‘काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर’; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती
4

‘काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर’; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.