Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर’; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या. त्यानंतर त्या निवडणुका लढलेल्या उमेदवारांसाठी संपूर्ण राज्यभरात प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याचा शुभारंभ कोकणातील चिपळूणमध्ये होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2026 | 08:06 AM
चिपळूणमध्ये काँग्रेसचे कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर सुरू

चिपळूणमध्ये काँग्रेसचे कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर सुरू

Follow Us
Follow Us:

चिपळूण : काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर असून, काँग्रेसची व संविधानाची जी विचारधारा आहे. त्या अभिनव भारताचा संकल्प या प्रशिक्षण शिबिरात करण्यात येईल. वैचारिक भूमिका लढण्यासाठी आवश्यक असणारा संघर्षाचा ‘ॲक्शन प्लॅन’ या कार्यशाळेतून तयार करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहरातील धवल मार्केट येथे काँग्रेसचे कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या हात निशाणीवर लढलेले आणि विजयी व पराभूत झालेले सर्व उमेदवार सहभागी झाले आहेत. याशिवाय नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांचा सहभाग आहे.

यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, राजापूरच्या नगराध्यक्ष हुस्नबानू खलीफे, काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, रमेश कीर, इब्राहिम दलवाई, सुरेश कातकर, चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक साजिद सरगुरोह, सफा गोठे काँग्रेसच्या महिला आघाडी चिपळूण तालुकाध्यक्ष निर्मला जाधव आदी उपस्थित होते.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

या शिबिरासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या. त्यानंतर त्या निवडणुका लढलेल्या उमेदवारांसाठी संपूर्ण राज्यभरात प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याचा शुभारंभ कोकणातील चिपळूणमध्ये होत आहे. यावेळी काँग्रेसला कोकणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही. या प्रश्नावर ते म्हणाले, आघाडीच्या राजकारणात काँग्रेसची थोडी पिछेहाट झाली. भारतात १९९९ पासून आघाडी युती अपरिहार्य ठरत गेली आणि तशा परिस्थितीत आम्ही लढत नाही म्हणून संघटना बांधणीकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले, अशी कबुली दिली.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, संघटना बांधणीसाठी मर्यादा आल्याने आमच्याजवळ सक्षम उमेदवार देखील नव्हते, अशी स्थिती मध्यंतरीच्या काळात निर्माण झाली. ही स्थिती बदलण्यासाठी आम्ही संघटना बांधणीवर भर देत आहोत. त्यासाठी हे प्रशिक्षण आहे. या शिबिराचे नियोजन काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली उत्तमपणे झाले आहे. याबाबत या शिबिरासाठी आलेल्या काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी व उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Three day camp for congress organization building says harshvardhan sapkal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • Congress Politics
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
1

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
2

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
3

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
4

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.