Hateful act of 50 year old man with an innocent seven year old girl! The accused was immediately arrested
वाशीम : सात वर्षांच्या निष्पाप मुलीसोबत घृणास्पद कृत्य (Hateful act) करून ५० वर्षीय नराधमाने (50 year old man) माणुसकीला काळिमा फासला. ही घटना मालेगाव तालुक्यातील मारसूळ (Marsul in Malegaon taluka) येथे २८ जून रोजी घडली आहे. मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील सात वर्षीय मुलगी २८ जून रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या दरम्यान मैत्रिणींसोबत गावातील चावडी जवळ खेळत होती. खेळणे आटोपून त्या निरागस मुलीच्या मैत्रिणी त्यांच्या घरी निघून गेल्या. पीडित सात वर्षीय मुलगीही तिच्या घरी जात होती. तर, आरोपी सुरेश परशराम घुगे ( ५० ) हा एकटाच चावडीवर बसला होता.
सदर नरधाम आरोपीने त्या निरागस बालिकेस बहाण्याने बाजुच्या गल्लीतुन निर्जन गोठ्यात नेले. तेथे आरोपीने त्या निष्पाप मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलगी कशीतरी आरोपीच्या तावडीतून सुटून घरी पोहोचली. घरी पोहोचलेल्या मुलीची अवस्था पाहून तिच्या आईने मुलीच्या आजीला आणि आपल्या नणंदेल याची माहिती दिली. तिघींनी मुलीची प्रेमाने विचारपूस केल्यावर मुलीने रडत रडत झालेला प्रकार कथन केला. या घटनेबाबत पीडित मुलीच्या आईने तात्काळ पतीसोबत मालेगाव पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती ठाणेदार किरण वानखेडे यांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदारांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पलता वाघ, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवी सैबेवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास ताजणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेंद्र तिखिले यांना सरकारी वाहन डायल ११२ घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यासाठी मारसूल गावात पाठवले. २८ जून रोजी रात्री ९.३० वाजता पीडित मुलीच्या आईने नोंदवलेल्या तक्रारी आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे मालेगाव पोलिसांनी भादंवि कलम ३७६ सह कलम ४, ८ लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या संवेदनशील प्रकरणाचा तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पलता वाघ यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास ताजणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेंद्र तिखिले हे करत आहेत.