शिरपूर येथे तासाभरात ७५ मिमी पावसाची नोंद; शेतात साचले पाणीच पाणी
बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यात विदर्भासह वऱ्हाडात सततच्या मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला. यामुळे रहिवासी वस्त्यांसह शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शिरपूर येथे सोमवारी ढगफुटीसदृश एक ते दीड तास मुसळधार पाऊस बरसला. यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
शिरपूर येथील संपूर्ण रस्ते पाण्याखाली आले. नद्या-नालेदेखील तुडुंब वाहत होते. विजांचा कडकडाट देखील भय निर्माण करणारा होता. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. एक ते दीड तासात 75 मिमी पावसाची नोंद झाली. शिरपूर येथे हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे सोमवारी ढगफुटीसारखा तूफान, धुवाधार पाऊस . यावेळी लखलखत्या विजाचा कडकडाट भय निर्माण करणारा होता. मुसळधार पावसाने येथील रस्ते संपूर्णतः जलमय झाले होते. तर नद्या-नाले तुडुंब भरून वाहत होते.
दरम्यान, या अचानक आलेल्या धुवाधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. तर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले. सलग काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने बळीराजा वैतागला आहे. या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, नागरिकांची मोठी तारांबळ पाहायला मिळाली.
काही वेळातच 75 मिमी पाऊस
शिरपूर येथे काही वेळातच 75 मिमी पाऊस झाल्याचे पर्जन्यमापक गजानन वाढे यांनी सांगितले. सोमवारी विजांच्या कडकडाट सुरू असताना शिरपूर येथे दोन ठिकाणी वीज देखील कोसळल्याची माहिती आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली
शिरपूर येथे सोमवारी विजाच्या कडकडाट सुरू असताना पडलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले, तर शिरपूर येथे दोन जागी वीज पडली. गवळी पुऱ्यातील विजेच्या रोहित्रावर वीज पडून रोहित्र भस्मसात झाले, तर वार्ड क्रं- १ मधील अमानुल्लाह कॉलनी येथील पीर मोहम्मद उर्दू हायस्कुल जवळ एका नींबाच्या झाडावर वीज पडली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.