अतिवृष्टीबाधित मदतीबाबत तत्काळ अहवाल सादर करा
रांजणी : यंदा पावसाने शेतकऱ्यांचे मोठे हाल केले आहेत. राज्यामध्ये मे महिन्यामध्येच वरुणराजाने हजेरी लावली होती. जोरदार अवकाळी पाऊस झाल्यानंतर आता मुसळधार धारा कोसळत आहेत. यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे भात पीक धोक्यात आले आहे. आदिवासी बांधवांवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर तसेच पाटण खोऱ्यातील भात शेती धोक्यात आली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
आंबेगाव जिल्ह्यातील एकूण 63 हजार 800 हेक्टर भात क्षेत्रापैकी 5 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात भात लागवड केली जाते. या भागातील आदिवासी बांधव दरवर्षी रोहिणी आणि मृग नक्षत्रात या शुभ मुहूर्तावर धुळ वाफेत भात पेरणी करतात यंदाच्या वर्षी आदिवासी बांधवांनी पेरणी केली. मात्र रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या पंधरा दिवस अगोदरच वळवाच्या पावसाने सुरुवात केली. या प्रचंड पावसामुळे जमिनीवरील वापसा संपूर्णपणे नष्ट झाला. त्यामुळे आदिवासी बांधवांना पारंपारिक कुटल्या पेक्षा हाताने कुडून भात पेरणी करावी लागली. पेरणी झाल्यानंतर मातीआड गेलेल्या दाण्याची पायरी उतरली. परंतु वरच्या दाण्याची पायरी न उतरल्यामुळे भात रोपे खूपच विरळ झाली आहेत .
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान पुढेही पाऊस थांबला नाही भात खाचरे पाण्याने तुडुंब भरून गेल्याने भात रोपांमध्ये पाणी साचले तर काही ठिकाणी भात रोपे झोपून जागेवरच कुजून गेली आहेत . उरलेल्या भात रोपांच्या काड्या अतिशय विरळ आणि तीरमिड्या झाल्यामुळे भात लागवड कशी करावी असा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर आहे . वरच्या दाण्यांची रोपे न उतरल्यामुळे रोपे निर्माण झाली नाहीत . भात लागवडीसाठी पुरेशी रोपे उपलब्ध होणार नाही परिणामी भात खाचरे ओसाड पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सध्या मागील आठवड्यापासून आदिवासी बांधवांनी परंपरेनुसार आपल्या गावांमध्ये सात प्रकारे ग्रामदैवताची पूजा केली. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर शेतीची कामे म्हणजे भात लागवड सुरू केली जाते. आदिवासी भागातील भात शेती हा शेतकऱ्यांचा एकमेव उदरनिर्वाहाचा स्रोत आहे. आणि ते त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार मानला जातो . गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या अनिष्ट परिस्थितीमुळे भात शेती संकटात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या एकूण पिकाची होणारी नासाडी यामुळे आदिवासी बांधवांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे दिसून येते. यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये हाताशी आलेले पीक जाण्याची शक्यता आहे.