निशिकांत दुबे यांची राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये हिंद विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा शिकवण्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे. याबाबत राज्य सरकारकडून पहिल्यांदा अनिवार्य तर नंतर पर्यायी भाषा म्हणून हिंदी लादण्याचा प्रयत्न झाला. यानंतर मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी तीव्र विरोध केल्यानंतर याचे दोन्ही शासन आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही महाराष्ट्रातील हिंदी भाषेच्या वापरावरुन वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठी ही मायबोली असून मराठी अस्मितेसाठी राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आले आहेत. तब्बल दोन दशकांनंतर हे ठाकरे बंधू एकत्रित आले असून त्यांची विजयी सभा देखील पार पडली. यावेळी त्यांनी राज्यामध्ये मराठी न बोलणाऱ्यांना चांगल्याच शब्दांत तंबी दिली आहे. या प्रकरणावर आता राज्यातील हिंदी भाषिक देखील आक्रमक भूमिका घेत आहेत. अनेक व्यावसायिक हे मराठी बोलणार नसल्याचे ठणकावून सांगत आहेत. त्यांच्या कार्यालयाची तोडफोड ही मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यामुळे हिंदी-मराठी वादावरुन राज्यामध्ये वाद पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर टीका करताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ही प्रतिक्रिया देतावना त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी परप्रांतीयवर हल्ला करणाऱ्या मनसे पक्षावर टीका केली आहे. मात्र ही टीका करताना त्यांनी कुत्रा शब्द वापरल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. निशिकांत दुबे यांनी लिहिले आहे की, “हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा, असे घणाघात निशिकांत दुबे यांनी केला. यापुढे त्यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना टॅग देखील केले आहे. त्यामुळे आता हा वाद चिघळ्याची शक्यता आहे.
“हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा.”@RajThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 6, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील मराठी भाषेसाठी पवित्रा घेणाऱ्या नेत्यांवरील टीकेचा मुद्द्यावरुन रोष व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी विधीमंडळ आवारामध्ये संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “त्या भोजपूरी अभिनेत्याला आम्ही सुद्धा दाखवतो मग काय होतं? सरकार महाराष्ट्रातील मराठी माणसांची सुरक्षा ठेवू शकत नाही. तर तुम्ही तुमचा पदाधिकारी आहे म्हणून त्याची सुरक्षा करुन दाखवावी,” असे थेट आव्हान रोहित पवार यांनी दिले आहे.