Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचे धुमशान! 100 गावांचा संपर्क तुटला अन्…; पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाला असून, तब्बल ५६ बंधारे पाण्याखाली गेले असल्याने  अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2025 | 09:57 PM
विदर्भात मुसळधार, नागपुरात कहर

विदर्भात मुसळधार, नागपुरात कहर

Follow Us
Close
Follow Us:
कोल्हापूर:  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून  धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असल्याने या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. पंचगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, वारणा वेदगंगा, घटप्रभा, भोगावती, ताम्रपर्णी सह जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्याने भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पंचगंगेची पाणीपातळी ३४ फुट ७ इंचांवर गेली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राधानगरी धरणात २७ % पाणी साठा होता तर आज राधानगरी धरण ६५ % पाणी साठा आहे.राजारामसह ५६ बंधारे पाण्याखाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.कोल्हापूरची तहान भागवणारा कळंबा तलाव देखील सांडव्यावरून आज ओव्हर फ्लो झाला आहे.
सततच्या पावसाने संपूर्ण शहराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. याचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला बसला असून, शहरातील प्रसिद्ध महाद्वार रोडसह अनेक भागांतील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. सकाळपासूनच कोल्हापुरात ढगाळ वातावरण होते, पावसाने नागरिकांची अक्षरशः दैना उडवली. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने पाटबंधारे विभागाने राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला आहे. सध्या प्रति सेंकद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ‘भोगावती’, ‘पंचगंगा’ काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत शाहूवाडी, गगनबावडा, गडहिंग्लज, आजरा, कागल, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी, दूधगंगा, कासारी, घटप्रभा, तुळशी धरणातून विसर्ग सुरू केला आहे.  त्यामुळे ‘भोगावती’ व पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे.  सद्या जिल्ह्यात ५६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदी आता इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, पंचगंगेची पाणी पातळी ३४.७ फुटांवर पोहोचली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर; 29 फुट पातळी अन् राजाराम बंधारा…

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाला असून, तब्बल ५६ बंधारे पाण्याखाली गेले असल्याने  अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लवकरच नदी इशारा पातळी गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. शंभरावर गावांचा थेट संपर्क तुटला आहे. पूर नियंत्रण कक्षाने पुढील यादी जाहिर केली असून, विविध नद्यांवरील बंधाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Heavy rains in kolhapur cut off connectivity to 100 villages panchganga river high level alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Heavy rain in Kolhapur
  • Kolhapur Rain
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला
1

कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला

Kolhapur Rain: पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; ‘या’ तालुक्यांमध्ये पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला
2

Kolhapur Rain: पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; ‘या’ तालुक्यांमध्ये पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Rain Alert:  महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे
3

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे

कोल्हापूरची पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर; संततधार पावासामुळे जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली
4

कोल्हापूरची पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर; संततधार पावासामुळे जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.