मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग; परभणी, नांदेडसह हिंगोलीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत होते. असे असताना आता राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबईतील कांदिवली, बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली.
रत्नागिरीत सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय, ढालघर फाट्याजवळ मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी दिसून आले. या मुसळधार पावसामुळे म्हसळामधील डोरजे पूल पाण्याखाली गेला आहे. हवामान विभागाने पावसाबाबत इशाराही दिला होता. जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, आणि कोल्हापूरच्या घाट भागात पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडेल. काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
विदर्भाला पावसाने झोडपले
विदर्भ जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. मात्र, पश्चिम विदर्भात नागरिक पावसाची प्रतीक्षा करत आहेत. धरण साठ्यात ४८ टक्के पाणी उपलब्ध असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे, कोल्हापुरात पावसाचं जोरदार आगमन झालं आहे.
पुढील 24 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये राजस्थानचा पूर्व भाग आणि त्याला लागून असणाऱ्या मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढे हाच पाऊस धीम्या गतीनं पश्चिमेकडे सरकताना दिसेल.
काय होता पावसाचा अंदाज…
पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे. मात्र, २० जुलैनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यातील अनेक भागात बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. अरबी समुद्रातून निर्माण होणारे मान्सूनचे वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय नसल्याने पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात हवेचा दाब जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर सक्रिय होण्याची शक्यता आहे.