शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थान अॅक्शन मोडवर ; निर्णयाची अंमलबजावणी उद्याच होणार
मुंबई : मनसेच्या मशिदींमधील लाऊडस्पीकरच्या भूमिकेमुळे हिंदूंचे अधिक नुकसान होईल, कारण २४०४ मंदिरे लाऊडस्पीकर वापरू शकणार नाहीत. सकाळची अजान मुस्लिमांनी बंद केली आहे. पण काकड आरतीही बंद झाली आहे. मनसेमुळे हिंदूंना जास्त त्रास झाला अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे(Hindus suffered more due to MNS Criticism of Congress).
मुंबईत एकूण २४०४ मंदिरे आणि ११४४ मशिदी आहेत. कालपर्यंत यापैकी फक्त २० मंदिरे आणि ९२२ मशिदींनाच परवानग्या आहेत. ५ मंदिरे आणि १५ मशिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचे म्हणणे ऐकून घेतले तर मशिदींसह २४०० मंदिरांना परवानगी मिळणार नाही. मनसेच्या आंदोलनाचे सर्व धार्मिक समुदायांवर परिणाम होतील.
चर्च, गुरुद्वारा आणि बौद्ध मंदिरांना याचा वापर करता येणार नाही. सार्वजनिक समारंभातही लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाणार नाही. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्व धर्माच्या प्रतिनिधींनी मनसेच्या भूमिकेला विरोध केला. त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीत काकड आरती झाली नाही, हे पाप कोणाचे? असेही सावंत म्हणाले.
मनसेची राजकीय स्वार्थी भूमिका, त्यांचा वेडेपणा आणि भाजपचा पाठिंबा पुरोगामी महाराष्ट्रासाठी हानीकारक आहे. भाजप शासित राज्यांनी लाऊडस्पीकरवर बंदी का घातली नाही याचे कारण अगदी स्पष्ट आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.
[read_also content=”IGCAR च्या शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा! चीन, अमेरिका सगळे पाया पडतील; भारताला हवं तसं जग चाले https://www.navarashtra.com/india/india-will-be-a-superpower-shocking-revelation-of-igcar-scientists-nrvk-276095.html”]
[read_also content=”OK म्हंटल्या शिवाय वाक्याचा शेवटचं होत नाही; OK शब्दामागची मनोरंजक हिस्ट्री आणि त्याचा फुल फॉर्म https://www.navarashtra.com/viral/interesting-history-behind-the-word-ok-and-that-full-form-276239.html”]
[read_also content=”कोणी गिफ्ट म्हणून किंवा फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; नाहीतर तुमच्या मागे अशी ईडा-पिडा लागेल की… https://www.navarashtra.com/lifestyle/jyotish-tips-for-good-life-nrvk-276206.html”]
[read_also content=”मुंबईत रेल्वे पुलाखाली अडकला कंटेनर; ड्राहव्हरने असं डोक लावलं की पोलिसही शॉक झाले https://www.navarashtra.com/latest-news/container-stuck-under-railway-bridge-in-mumbai-nrvk-276226.html”]