Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गरज पडली तर कठोर पावले उचला’,राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

राज्यातील शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • By साधना
Updated On: May 03, 2022 | 02:14 PM
‘गरज पडली तर कठोर पावले उचला’,राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
Follow Us
Close
Follow Us:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरून लाऊडस्पीकर  (Loudspeaker Row) काढण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रसंगी कठोर पावले उचला, असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले आहेत.

आज झालेल्या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. राज्यातील शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलण्याचे गृहमंत्र्यांनी दिले. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खबरदारीचा उपाय म्हणून काहींना नोटीस देण्यात आल्या आहेत. तेढ निर्माण करताना एखादी व्यक्ती, गट आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील संवेदनशील भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले. पोलीस महासंचालकांनी सांगितले की, आम्ही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या आहेत. राज्यात कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही. जे कायदा बिघडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Home minister dilip walse patil order to police to take action against people not following law and order nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2022 | 02:11 PM

Topics:  

  • Home Minister
  • Law And Order

संबंधित बातम्या

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”;  DYSP धनंजय पाटलांचा इशारा
1

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”; DYSP धनंजय पाटलांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.