Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान

दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली होती. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील साखळी चोरण्याचे प्रकार सर्रास होत होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 13, 2024 | 11:47 AM
उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान
Follow Us
Close
Follow Us:

वसई । रविंद्र माने : पालक आणि अल्पवयीन मुलींमध्ये दहशत निर्माण करणारा सिरियल रेपीस्ट, सोनसाखळी चोर, हत्या, अंमली पदार्थां विरोधी कारवाई अशा केसेसे मध्ये उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आयुक्त मधुकर पांण्डेय यांच्या मार्फत सन्मान करण्यात आला आहे. त्यात गुन्हे शाखा २ आणि ३, मध्यवर्ती गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा, नवघर, काशिमिरा आणि विरार पोलीस हे फेब्रुवारी महिन्यातील उत्कृष्ट तपासाचे मानकरी ठरले आहेत.

एका सिरियल रेपिस्टने वसईत प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याने एका ७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. या सिरियल रेपिस्टचा पालकांनाही धसका घेतला होता. पोलीसांसाठी हे प्रकरण एक आव्हान ठरले होते, लवकरात लवकर त्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते. अशावेळी कोणताही ठोस पुरावा-दुवा नसताना गुन्हे शाखा २ चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे आणि त्यांच्या पथकाने अथक परिश्रम करून सीसीटीव्हीच्या आधारे तसेच इतर तांत्रिक तपास करून आरोपीला सुरत येथून अटक केली. या कामगिरीबद्दल शाहूराज रणावरे यांना गौरविण्यात आले आहे.

दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली होती. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील साखळी चोरण्याचे प्रकार सर्रास होत होते. मात्र, दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा हा प्रकार गंभीर आणि नवखा होता. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून तलासरी येथून अमित शनवारला अटक केली. तसेच त्याने विरार, नालासोपारा तसेच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केलेले सोनसाखळी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी केला होता. त्याला ‘उत्कृष्ट तपास क्रमांक १’ चा पुरस्कार देण्यात आला.

भाईंदरला चोरीच्या संशयावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती, त्याचा मृतदेह बीपी रोड येथील शौचालयात आढळला होता. नवघर पोलिसांनी कसलाही दुवा नसताना सीसीटीव्हीच्या आधारे ६ तासांच्या आता हत्या करणार्‍या चौघांना अटक केली होती. या प्रकरणाची उकल करणाऱ्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी उत्कृष्ट उकल केल्याचा क्रमांक ३ चा पुरस्कार देण्यात आला आहे. तर मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि काशिमिरा पोलिसांनी रिक्षा आणि मोटारसायकल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीकडून ११ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले होते. याप्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख आणि काशिमिरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना उत्कृष्ट उकल क्रमांक ४ च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

गेल्या दोन महिन्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी शाखेने सव्वा दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. तसेच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. तसेच विरार पोलिसांनी २ लाखांचा गांजा जप्त केला होता. या कारवाईसाठी अमली पदार्थ विरोधी शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमर मराठे आणि विरार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांना सर्वोत्कृष्ट उकल क्रमांक ५ आणि ६ ने सन्मानित कऱण्यात आले आहे. पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी हा गौरव केला.

Web Title: Honorable police officers who performed excellent investigations by the commissioner palghar crime case thane maharashtra police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2024 | 11:47 AM

Topics:  

  • palghar crime case
  • thane

संबंधित बातम्या

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
1

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
2

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
3

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?

Thane News : “दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना…”, जितेंद्र आव्हाडांचा इशारा
4

Thane News : “दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना…”, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.