
Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात
मुख्य म्हणजे यावेळी भाजप नेत्यांनी चतुराई दाखवत आपल्या कोणत्याही नगरसेवकांच्या नावे हा ठराव न मांडता, १४ गावांमधील अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक भरत भोईर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत ठरावाची सूचना मांडली आहे. स्वपक्षातूनच शह देण्याचा प्रयत्न केला गेल्याने आ. मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी सायंकाळी उशिरा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे ८.४० एकरामध्ये उभारले जाणार असून अंदाजे ८१९.३० ते ८५० कोटी खर्च येणार आहे. तसेच या हॉस्पिटलमधील रुग्णाची क्षमता ही ५०० बेड हून अधिक राहणार आहे. तसेच सदर उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजवर पूर्ण नियंत्रण हे नवी मुंबई महानगरपालिकाचे असणार आहे. तसेच लवकरच सिडको प्राधिकरण यांच्या बरोबर करार होणार असून निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्य सरकार, सिडको आणि महापालिकेकडून लागणाऱ्या सर्व मान्यता आणि मंजुरी, परवानग्या मिळाल्या आहेत.
या रुग्णालयासाठी सिडकोने भुखंड दिल्यावर, या भूखंडाचा मैदान म्हणून वापर करणाऱ्या क्रिकेट संघटना तसेच इतरही पर्यावरण संघटना कोर्टात गेल्या आहेत. आमचा रुग्णालयाला विरोध नसून, रुग्णालय व्हावे मात्र ते इतरत्र व्हावे अशी मागणी ४० प्लस या क्रिकेट संघटनेने केली आहे. याबाबत त्यांनी गणेश नाईकांकडे देखील मागणी केली होती. मात्र आता सिडकोने हा भूखंड पालिकेला हस्तांतरित केल्यावर, पालिकेने देखील त्याचे पैसे सिडकोला अदा केले आहेत, मात्र आता आ. मंदा म्हात्रे यांनी सत्याने गणेश नाईक यांच्याविरोधात आवाज उठवला असताना, अखेर पालिकेतील सत्तेच्या जोरावर आ. मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रकल्प रोखण्याचा प्रस्ताव पहिल्याच महासमेत सताधारी भाजपाने आणला आहे. त्यामुळे आगामी काळात आ. मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांच्यातील वितुष्ट कोणते टोक गाठते ते पाहावे लागणार आहे.
Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..
पीजी, नर्सिंग शैक्षणिक वस्तीगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रूग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा, नर्सिंग वस्तीगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर वस्तीगृह, व इतर अनेक सुख-सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही वास्तू तळमजल्यासह ७वाहनतळ यात असणार आहे. पालिकेचे स्वतःचे मल्टीस्पेशालटी रुग्णालय असावे, अशी मागणी वाढत होती. कोविड काळात स्वस्तात उपचार करणा-यारुग्णालयाची गरज प्रकर्षाने जाणवली होती. गेली अनेक वर्ष आ. म्हात्रे या रुग्णालयासाठी पाठपुरावा करत होत्या. शासनाने अल्प किमतीत पालिकेला भुखंड देत जीएसटी रक्कम देखील माफ केली होती. हे रुग्णालय झाल्यास नागरीकांना अत्याधुनिक उपचाराकरिता खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागणार नाही नसून, स्वस्तात उच्च दर्जाचे उपचार मिळणार आहेत. याच इमारतीत कॉलेज देखील सुरू होणार असल्याने विद्याथ्यांना शैक्षणिक सुविधा मिळणार आहे.
रुग्णालय या प्रयोजनासाठी सिडकोने २१६२३.१६ चौ.मी. क्षेत्रफळाचा भुखंड पालिकेला दिला आहे. हा भुखंड घेताना, शहरात पालिकेची अनेक रुग्णालये असताना तर पोसला जाणार नाही ना? खर्च पालिकेला परवडेल का? आर्थिक भाराचे काय ? असे अनेक प्रश्न विचारून आ. मंदा म्हात्रे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. मात्र त्यावर मात करत पालिकेला रुग्णालय चालवणे जड जाऊ नये म्हणून आ. म्हात्रे यांनी ४० टक्के वाणिज्यिक वापराची मागणी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. पालिकेने देखील तातडीने सिडकोकडे मागणी केल्यावर, सिडकोने तातडीने नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवला होता.